Sulochana Chavan passed away: जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

आपल्या गायनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे.
Sulochana Chavan passed away | Marathi Lavani Singer | Lawni Samradni Sulochana Chavan Death
Sulochana Chavan passed away | Marathi Lavani Singer | Lawni Samradni Sulochana Chavan DeathDainik Gomantak
Published on
Updated on

Marathi Lavani Singer: साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचे निधन झाले आहे. आज 10 डिसेंबर रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुचोलना यांची प्रकृती खालावली होती. आज फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

Sulochana Chavan passed away | Marathi Lavani Singer | Lawni Samradni Sulochana Chavan Death
Sara Ali Khan ने केली मुंबई लोकची सफर, व्हिडिओ शेअर करत म्हणली....

सुलोचना चव्हाण यांना 'पद्मश्री' या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा अनेक लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत. 

ठसकेबाज लावण्यांनी सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. 'रंगल्या रात्री' या टित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा लावणी गायली होती. फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली. लावणीच्या चपखल, फटकेबाज शब्दांना आपल्या सुरांच्या माध्यमातून ठसका देण्याचं काम त्यांनी केलं. सुलोचनाबाईंनी लावणीसह भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचे दालन समृद्ध केले होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com