Irani Filmmaker Mahnaz Mohammadi: इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ केरळ (IFFK) सुरवातीपासूनच चर्चेत आला आहे. त्याचे कारण आहे, इराणच्या महिला दिग्दर्शिकेने केलेली कृती. दिग्दर्शक महनाज मोहम्मदी यांनी या फेस्टिव्हलसाठी स्वतःचे केस कापून पाठवले आहेत.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ केरळला शुक्रवारपासून सुरवात झाली. यंदाचे फेस्टिव्हलचे 27 वे वर्ष आहे. 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर असा या फेस्टिव्हलचा कालावधी असणार आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सेलिब्रिटींचा सत्कार केला जाणार आहे, अनेक चांगले चित्रपट दाखवले जाणार आहेत.
(International Film Festival Of Kerala)
फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी इराणच्या दिग्दर्शक महनाज मोहम्मदी यांना 'स्पिरिट ऑफ सिनेमा' या पुरस्काराने गौरविण्यात आले. हे अॅवॉर्ड स्विकारण्यासाठी महनाज यांना स्वतःला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांची मैत्रिण आणि ग्रीक फिल्ममेकर एथिना रचेल त्सांगरी यांनी महनाज यांच्यावतीने हा पुरस्कार स्विकारला. विशेष म्हणजे महनाज यांनी एथिना यांच्यासोबत त्यांचे केस पाठवले होते.
महनाज यांनी का पाठवले केस?
गेल्या काही महिन्यांपासून इराणमधील महिला त्यांच्या स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. सप्टेंबरमध्ये 22 वर्षीय युवती महसा अमिनी हिला हिजाब परिधान न केल्यावरून अटक करण्यात आली होती आणि पोलिस कस्टडीत तिचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इराणमध्ये महिला हिजाबला विरोध करत आहेत आणि त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले आहे. महिला हिजाब जाळून आणि केस कापून या घटनेचा विरोध करत आहेत.
फिल्ममेकर महनाज मोहम्मदी या सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्या महिलांच्या हिताची लढाई लढत आहेत. महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत राहिल्याने त्यांना इराण सरकारने देशाबाहेर पडण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे त्या केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःचे कापलेले केस पाठवून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
महनाज यांचा संदेश
महनाज यांच्यासाठीचा पुरस्कार स्विकारताना एथिना रचेल त्सांगरी यांनी महनाज यांचा संदेशही वाचून दाखवला. त्यांनी लिहिले आहे की, हे माझे केस आहेत. आमचे दुःख जगाला कळावे म्हणून मी हे केस कापून पाठवत आहे. आम्हाला बरोबरीचा अधिकार हवा आहे. त्यासाठी एकजूट गरजेची आहे.
दरम्यान, महनाज यांनी पाठवलेले केस या चित्रपट महोत्सवाचे संचालक रंजीन यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.