Amitabh Bachchan Viral Tweet: हे मोठे होतात, मग सोडून जातात; जिवलग मित्राच्या मृत्युनंतर बिग बी यांची भावना

सोशल मीडियात शेअर केली इमोनशल पोस्ट; ब्लॉगमधुनही व्यक्त केल्या भावना
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Dainik Gomantak

Amitabh Bachchan Viral Tweet: महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरात एक दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या जिवलग मित्राचा मृत्यू झाला आहे. स्वतः बिग बी यांनीच सोशल मीडिया आणि ब्लॉगमध्ये ही माहिती चाहत्यांना दिली आहे. या घटनेमुळे बिग बी सध्या अस्वस्थ आहेत. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी, जवळच्या मित्राचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

Amitabh Bachchan
Aamir Khan: आता बास झाले... 'इतकी' वर्षे घेणार ब्रेक!

बच्चन यांच्या आवडत्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले आहे. त्यामुळे सध्या ते दुःखात आहेत. या कुत्र्याचे स्मरण करत बिग बी यांनी बिग बी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माझा एक लहानसा दोस्त... एक दिवस हे मोठे होतात आणि एके दिवशी सोडून जातात...'

याशिवाय अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, हे मनाला खूप यातना देणारे आहे. तो जेव्हा आसपास असायचा तेव्हा ते आमचा जीव की प्राण असायचा. तो आमचा जणू आत्माच बनला होता.

बिग बी यांनी त्यांच्या कुत्र्याचे नाव मात्र सांगितलेले नाही. अमिताभ बच्चन यांनी या पोस्टमध्ये त्यांच्या हातात कुत्र्याचे एक छोटे लॅब्राडॉर जातीचे पिल्लू धरलेला फोटोही टाकला आहे. सोशल मीडियात ही पोस्ट व्हायरल झाली आहे. यापुर्वी 2013 मध्ये बिग बी यांच्या जुन्या शनौक या कुत्र्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता.

Amitabh Bachchan
Shubhman Gill-SaRa Ali Khan: सारा का सारा सच है!

बिग बींच्या या पोस्टवर त्यांचे फॅन्सही खूप इमोशनल झाल्याचे दिसून येत आहे. एकाने त्यावर कॉमेंट केली आहे की, पाळीव प्राणी हे प्रेमासारखे अत्यंत किमती असतात. तर पाळीव प्राण्यांचे आपल्यावरील प्रेम हे पवित्र असते. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, सोबत मोठी नसेलही पण खूप प्रेम करतात, म्हणूनच ते माणसाचे सर्वात चांगले मित्र असतात.

दरम्यान, बिग बींच्या कामाबाबत बोलायचे तर ते आगामी काळात सुरज बडजात्या दिग्दर्शित 'उँचाई' मध्ये आहेत. याशिवाय दीपिका पदुकोन आणि प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' मध्ये ते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहे. तर टायगर श्रॉफच्या 'गनपथ'मध्येही ते आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com