Salman Khan Got Death Threat :"30 एप्रिलला सलमानला संपवणार"..धमकी देणारा तरुण राजस्थानचा...

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी आहे.
Salman Khan Got Death Threat
Salman Khan Got Death ThreatDainik Gomantak
Published on
Updated on

Salman Khan Recieved Death Threat: सलमान खान पुन्हा एकदा धमक्यांमुळे चर्चेत आला आहे . सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यावेळी रॉकी भाईं नावाच्या तरुणाने बॉलिवूडच्या भाईजानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

 रिपोर्ट्सनुसार, रॉकी भाई जोधपूरचा असून तो गोरक्षक देखील आहे. ३० एप्रिलला सलमान खानला ठार मारेल, असे या धमकीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

या धमकीनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एएनआयने ट्विट करून सलमान खानबद्दल ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'काल पोलिस नियंत्रण कक्षात एक कॉल आला आणि त्या व्यक्तीने स्वत:ची ओळख रॉकी भाई अशी दिली, जो जोधपूर, राजस्थानचा आहे. 

३० एप्रिलला तो सलमान खानला मारणार, असे त्यात म्हटले होते. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Salman Khan Got Death Threat
Top 5 Inspirational Bollywood Movies: 'या' मुव्हीज तुम्हाला देतील ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा...

यापूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. 

सलमान खानने नुकतीच रुंद रंगाची बुलेट प्रूफ निसान एसयूव्ही कार खरेदी केली असून त्याची सुरक्षा वाढवण्यासोबतच त्याला शस्त्र ठेवण्याचा परवानाही देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com