रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखले जातो. गेल्या वर्षी लॉकडाउन (Lockdown) दरम्यान, तो आणि जेनेलिया डिसूझा (Genelia D'Souza) टिकटॉक (TikTok Video) व्हिडिओवर सतत अॅक्टिव (Active) असत. त्यांचे टिकटॉक व्हिडिओ सतत व्हायरल होत होते. हे व्हिडिओ इतके मजेदार होते की कोरोना आणि लॉकडाउनच्या तणावपूर्ण काळातही ते एखाद्याचा मूड चांगला करू शकत होते. रितेश-जेनेलियाचे मजेदार व्हिडिओ (Video) चाहत्यांमध्ये सतत लोकप्रिय होत होते. पण देशात टिकटॉकवर (TikTok) बॅन आले आणि आता रितेश देशमुखने यावर एक मजेदार विधान केले आहे.
त्याने म्हटले की टिकटॉकच्या बंदीमुळे तो बेरोजगार झाला. परंतु, इन्स्टाग्राममध्ये रील फीचर असल्याने मी व्हीडीओ तयार करू शकतो. रितेश म्हणाला, कोरोना काळात त्याने आणि जेनेलियाने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मजेदार व्हिडिओ (Video) बनवण्यास सुरुवात केली.
एका मुलाखतीमध्ये रितेश म्हणाला, लॉकडाउन दरम्यान प्रत्येक व्यक्ति अनेक समस्यांना सामोरे जात होता. अशावेळी आम्हाला वाटले की आम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आम्ही स्वत:वर विनोद करायला लागलो. अशाप्रकरे आम्ही टिकटॉक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पण टॉकटॉकवर बंदी आल्याने असे वाटले की मी बेरोजगार झालो आहे. असे वाटत होते की अरे देवा आता मी काय करावे? जे काम होते ते गेले.
रितेश पुढे म्हणाला, काही दिवसांनंतर इंस्टाग्रामवर रील फीचर आले. मी म्हणालो की रीलवर व्हिडिओ बनवता येतील. रितेश आणि जेनेलिया फ्लिपकार्ट व्हिडिओ 'लेडीज वि जेंटलमॅन' च्या सीझनचे होस्ट आहेत. ते सध्या फ्लिपकार्ड व्हिडिओवर स्त्रीम होत आहेत. रितेश देशमुख "क्या कूल हैं हम, मस्ती, हे बेबी, हाउसफुल, एक विलन यासारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.