Gadar 2 मधील तारा सिंह पुन्हा चाहत्यांचे मन जिंकणार: दिग्दर्शक अनिल शर्मा

आजपर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट आहे.
Gadar 2 मधील तारा सिंह पुन्हा चाहत्यांचे मन जिंकणार: दिग्दर्शक अनिल शर्मा
Gadar 2 मधील तारा सिंह पुन्हा चाहत्यांचे मन जिंकणार: दिग्दर्शक अनिल शर्माDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड स्टार सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. गदर हा एक आयकॉनिक चित्रपट (Movie) आहे. या मागे अनेक कारणे आहेत. चित्रपटामधील गाणी(Song) , चित्रपटमधील हँडपंप उखडण्याचे दृश्य प्रेक्षकांनाच्या आठवणीत आहे. या चित्रपटामध्ये सनी देओल, अमीषा पटेल (Ameesha Patel) आणि अमरीश पुरी मुख्य (Amrish Puri) भूमिकेत होते. या चित्रपटाची कथा शक्तीमान यांनी लिहिली होती आणि अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केली होती. आजपर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट आहे. चाहते 'गदर' या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

* दिग्दर्शक म्हणाले- चित्रपटामध्ये भरपूर अॅक्शन आणि नाटक असेल

दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. ज्या लोकांना 'गदर' चित्रपट आवडतो त्यापैकी बहुतेकांना काळजी वाटते की आपण चित्रपटाला न्याय देवू शकू की नाही. सनी सर, शक्तिमान जी आणि मी हा निर्णय अत्यंत जबाबदरीने घेतला आहे. ते म्हणाले, 'गदर2' मध्ये देखील प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळतील.

Gadar 2 मधील तारा सिंह पुन्हा चाहत्यांचे मन जिंकणार: दिग्दर्शक अनिल शर्मा
दिया मिर्झा-आर माधवन यांच्या RHTDM ला 20 वर्षे, आजही चाहते प्रेमात

त्यांनी पुढे सांगितले की, चित्रपटाचे प्री- प्रोडक्शनचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. सनी देओल तारा सिंह, अमीषा सकीना आणि जीत भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या मते, जुन्या कला कलाकारांसोबत चित्रपट बनवणे हे चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.

अनिल शर्मा यांना विश्वास आहे की तारा सिंह हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय पात्र आहे आणि त्याचा सिक्वेलत्याच्या तिच्या कुटुंबाची कथा पुढे नेईल. त्यांनी सांगितले की या चित्रपटांची टॅगलाइन 'द कथा कंटिन्यूज' आहे. या चित्रपटाची कथा देखील 'बाहुबली' आणि गॉडफादर' सारखी चालू आहे.काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे मोक्षण पोस्टर रिलीज करण्यात आले होते. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सनी देओल दिसत आहे. त्यांनी ही माहिती आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com