मीना कुमारी हे बॉलीवूडच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या आणि एक विलक्षण विलय लाभलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेत्री मीनाकुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. मीना कुमारी या नावानं त्यांनी बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली मात्र त्यांचं मूळ नाव 'महजबी बानो' असं होतं.
फक्त ३८ वर्ष जगणाऱ्या मीनाकुमारी यांनी चित्रपट सृष्टीत मोठं नाव कमावलं. त्यांनी केवळ भारतापर्यंतच नव्हे तर परदेशातही त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
बालपणापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरवात केली. त्यानंतर ३० वर्षांच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये त्यांनी जवळपास ९० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले.
'पिया घर आजा', 'श्री गणेश महिमा', 'परिणिता' आणि 'बैजू बावरा' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले, त्या एक उत्तम नर्तिका देखील होत्या. मीना कुमारी केवळ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळेच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत होत्या.
आता सध्या मनोरंजन विश्वात बायोपिकवर अधिक भर दिला जात असल्याने आता ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्या जीवनावर देखील बायपिक बनणार आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ही बायोपिक बनवणार असल्याचं बोललं जात आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेत्री क्रिती सेननही मीना कुमारीची भुमिका साकारणार असल्याचा दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
सध्या चित्रपटाचे स्क्रिप्टिंग सुरु असून त्यानंतर चित्रपटाच्या कलाकारांचे कास्टिंग केले जाणार आहे. लवकरच मीना कुमारी यांच्या जीवनावरील बायोपिकचे चित्रीकरण सुरु होणार आहे. या चित्रपटाद्वारे मनीष मल्होत्रा दिग्दर्शन क्षेत्रात प्रदार्पण करणार आहे. त्याचबरोबर टी-सीरीज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
ट्रॅजेडी क्वीन म्हटल्या जाणार्या मीना कुमारी यांचे आयुष्य खुप वेदनादायी होते. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मीना यांना गरिबीमुळे अभ्यास करता आला नाही त्यामुळे त्यांनी बालपणात काम करायला सुरुवात केली.
वयाने 15 वर्षांनी मोठा असलेल्या शायर दिग्दर्शकाशी लग्न केलं. पण वैचारिक मतभेदांमुळे 1964 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
नंतरच्या काळात मीना दारूच्या व्यसनामुळे आजारी पडू लागल्या आणि त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार झाला, ज्यावर परदेशात उपचार झाले पण त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकल्या नाहीत. त्यांनी 31 मार्च 1972 रोजी जगाचा निरोप घेतला. आता क्रिती सेनन त्यांची भुमिका साकारणार असल्याने ती त्याच्या पात्राला योग्य न्याय देवू शकते की नाही हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.