Eijaz Khan : मी आर्यन खान आणि राज कुंद्राला जेलमध्ये असताना मदत केली होती, या अभिनेत्याचा दावा...

शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि पॉर्न फिल्ममुळे जेलमध्ये जावं लागलेला राज कुंद्रा सध्या या अभिनेत्यामुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहेत.
Eijaz Khan
Eijaz KhanDainik Gomantak
Published on
Updated on

बिग बॉस फेम एजाज खान नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती पण 19 जून 2023 रोजी त्याला जामीन मिळाला होता. आता लॉकअपमधून बाहेर आल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपले दिवस कसे घालवले हे सांगितले. एजाज खानने सांगितले की, तुरुंगात अनेक समस्या होत्या. गलिच्छ स्नानगृहांपासून ते दगडासारखी भाकरी खाण्यापर्यंत ते दिवस घालवले.

एजाज खान म्हणतो

ड्रग्ज प्रकरणात एजाज खानने २६ महिने मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढले. गुरुवारी त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, कारागृहात 400 हून अधिक कैदी आहेत, मात्र केवळ 3 बाथरूम आहेत. खाण्यापिण्याच्या समस्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

त्याने सांगितले की तिथे खूप कोरडी भाकरी मिळते. तांदूळ दगडासारखा असायचा. एजाज खानने इंडस्ट्रीला कामाचे आवाहन केले आहे. त्याने सर्वांना काम देण्याची विनंती केली. कुटुंबासाठी आणि सर्व गरजांसाठी त्याला सध्या कामाची नितांत गरज आहे.

Eijaz Khan
Melbourne Film Festival : मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात, या चित्रपटाने होणार मुहूर्त

आर्यन खान आणि राज कुंद्राला मदत केली

पत्रकार परिषदेत एजाज खानने आर्यन खान, राज कुंद्रापासून अनेक स्टार्सची नावे घेत सांगितले की, तुरुंगात त्याने इंडस्ट्रीतील मित्रांना जेवण आणि इतर गरजा पुरवल्या. त्यांनी सांगितले की हे जगातील सर्वात गर्दीचे तुरुंग आहे. 

800 लोकांची क्षमता असलेल्या या कारागृहात 3000 हून अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. एजाज खानने सांगितले की, तो तुरुंगात असताना अभिनेता रणदीप हुड्डा आणि मिका सिंग यांनी त्याच्या कुटुंबाला मदत केली होती. तो दोन्ही स्टार्सचा खूप आभारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com