Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंगच्या फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ!

Ranveer Singh Photos: रणवीर सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
Ranveer Singh Photoshoot
Ranveer Singh PhotoshootInstagramn
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याची अतरंगी स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. पण अनेकवेळा तो यासाठी ट्रोलही झाला आहे. रणवीर त्याच्या फॅशन स्टाइलवर खूश असून लोकांच्या बोलण्याकडे तो लक्ष देत नाही. यावेळी रणवीरने आपल्या फोटोशूटने इंटरनेटवर अधिराज्य गाजवले आहे. रणवीरने असे फोटोशूट केले आहे, जे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. रणवीरने एका मासिकासाठी कपडे न घालता फोटोशूट केले आहे. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Ranveer Singh Photoshoot News)

रणवीरने (Ranveer Singh) एका मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. रणवीरचे हे फोटो (Photo) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

* दिलेल्या वेगवेगळ्या पोज

फोटोंमध्ये रणवीर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. रणवीरने या मॅगझिनशी त्याच्या चित्रपटांबद्दलही चर्चा केली आहे. फोटोंसोबत रणवीरची मुलाखतही दाखवण्यात आली आहे. फोटोंमध्ये रणवीर बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. रणवीरच्या काही चाहत्यांना त्याचे हे फोटोशूट आवडले आहे, तर काही लोक त्याला ट्रोल करत आहेत.

युजर्सनी केलेल्या कमेंट्स

रणवीरने त्याच्या फोटोंमुळे इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. प्रत्येक यूजरने लिहिले - दीपिका दीदी हे पाहतील आणि ती काय म्हणेल. एका चाहत्याने रणवीर सिंगचे हे फोटोशूट मिलिंद सोमणकडून प्रेरणा घेतल्याचे सांगितले आहे.

रणवीर सिंग लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या चित्रपटात (Movie) दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. याशिवाय रणवीर रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com