युवा मंत्री आदित्य ठाकरेंचा विद्यार्थ्यांना सल्ला, म्हणाले- राजकारणापासून दूर राहा

महाविद्यालय हे शिक्षणाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी याठिकाणी फक्त अभ्यास करावा, आपले करियर घडवावे जेणेकरून तुमचे भविष्य उज्वल होईल, असे आदित्य ठाकरे एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे
राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरेDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राजकारणापासून दूर राहून केवळ अभ्यास आणि नोकरीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. 'कोणत्याही कॉलेजमध्ये राजकारण होता कामा नये. पण आजकाल ते होत आहे. महाविद्यालय हे शिक्षणाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी याठिकाणी फक्त अभ्यास करावा, आपले करियर घडवावे जेणेकरून तुमचे भविष्य उज्वल होईल, असे आदित्य ठाकरे एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. (Youth Minister Aditya Thackeray advises students to stay away from politics)

राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे
महाराष्ट्र सरकारचा अनोखा उपक्रम; आता कैद्यांनाही मिळणार कर्ज

महाराष्ट्रातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधन केंद्र, प्रदर्शन केंद्र आणि मुलींच्या वसतिगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी बुधवारी या गोष्टी सांगितल्या. यावेळी ते म्हणाले, 'तरुण पिढीला काय हवे आहे? त्यांना शिक्षण आणि रोजगार हवा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त शिक्षण हाच प्राधान्यक्रम राहिला पाहिजे.

शिवसेना नेते आणि महाराष्ट्र (Maharashtra) सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, 'आमची शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम अनेक वर्षांचा आहे. यामध्ये बदल आवश्यक आहे जेणेकरून मुलांना भविष्याबद्दल शिकवता येईल.

राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर 4 कोटी जप्त, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तसेच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावता येईल. देशात सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे, पण नोकऱ्या वाढत नाहीत. त्याची चिंता आहे, असे म्हणत त्यांनी यावेळी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

'देशाचे मोठे प्रश्न कोणीच सोडवत नाही. पूर्वी भारताला (India) महासत्ता बनवण्याच्या गोष्टी होत होत्या. पण या गोष्टी गेल्या कुठे? देशात गरिबी आणि महागाई वाढत आहे. मात्र याबाबत काहीही केले जात नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींवर त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी चर्चा केली. ते म्हणाले, 'विधानसभा निवडणुका (Assembly Election) संपल्या आहेत, आता केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील निवडणुकीपर्यंत त्यांचे भाव खाली येण्याची वाट पाहावी लागणार आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर ते म्हणाले की, बहुतांश निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र यामुळे कोरोनाचे प्रमाण आणखी वाढू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com