IT चे धाडसत्र सुरुच, यशवंत जाधवांकडून कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे उघड

बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला होता.
Yashwant Jadhav
Yashwant JadhavDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईतील (Mumbai) शिवसेनेचे नगरसेवक आणि बीएमसीच्या (BMC) इतर काही नगरसेवकांच्या (Councilor) ठिकाणांवर आयकर विभागाने (Income Tax Department) नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये 130 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला होता. (Yashwant Jadhav Was Raided By The Income Tax Department)

दरम्यान, आता आयकर विभागाने या छाप्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यात काही कथित बेनामी संपत्तीचाही समावेश आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने एका निवेदनात म्हटले आहे की, विभागाने 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील 35 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले. निवेदनानुसार, “या कंत्राटदारांनी दोनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

Yashwant Jadhav
नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ

तसेच, निवेदनात पुढे म्हटले की, 'स्थावर मालमत्तेचे तपशील, ज्यांची किंमत 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारांमध्ये त्याचा सहभाग आणि चुकीच्या पद्धतीने कमावलेले पैसे काही परदेशी अधिकारक्षेत्रात हस्तांतरित केल्याचा पुरावाही जप्त करण्यात आला आहे.'

शिवाय, आयकर विभागाने सांगितले की, "प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की या कंत्राटदारांनी वरील गैरप्रकारांमुळे 200 कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्नाची चोरी केली आहे. या शोध मोहिमेदरम्यान 2 कोटी रुपयांची रोखड आणि 1.5 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरु आहे.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com