नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या भोवती फिरत आहे.

Nawab Malik
Nawab MalikDainik Gomantak
Published on
Updated on

Dawood Money laundering Case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने 7 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (Ed) कोठडीचा कालावधी आज संपत होता, मुदतवाढीच्या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. अनिल सिंग हे ईडीच्या वतीने तर अमित देसाई आणि तारक सय्यद हे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या तर्फे न्यायालयामध्ये हजर होते. मलिकांना मागील काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे संपूर्ण तपास होऊ शकला नव्हता. त्यानंतर आता ईडीकडून 6 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

अनिल सिंह म्हणाले, 'आम्ही हसीना पारकर यांच्या मुलाचा कबुलीजबाब कोर्टात दिला आहे, त्याशिवाय तुरुंगात असलेल्या आरोपीचे कबुलीजबाबही कोर्टात सोपवण्यात आला आहे. ही माहिती आम्ही आत्ता सर्वांना सांगू शकत नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेकांच्या चौकशीबरोबरच व्यवहाराची माहिती आणि तपास करावा लागणार आहे. यात कोणाचा सहभाग आहे याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे अशा अनेक बाबींचा तपास होण बाकी आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संपूर्ण चौकशी होऊ शकली नाही. त्यामुळे मलिकांच्या 6 दिवस कोठडीची गरज आहे.'


Nawab Malik
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते नवाब मलिक दवाखान्यात भरती

शिवाय ते पुढे म्हणाले, ''नवाब मलिक आणि अंडरवर्ल्डचे संबंध असल्याचे ईडीकडून गेल्या वेळी कोर्टात सांगण्यात आले होते. तेव्हा त्यांचा टेरर फंडिंगमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले. हसीना पारकरला 55 लाख रुपये दिल्याचा आरोप करुन त्यास टेरर फंड म्हटले आहे. परंतु आज ईडीच्या अर्जात काय म्हटले आहे ते पाहा. ईडीचा अर्ज सूचित करतो की, मागच्या वेळी 55 लाख रुपयांची चर्चा टायपिंग मिस्टेक होती ती फक्त 5 लाख रुपये आहे. मात्र या अर्जाच्या आधारे त्यांना ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. त्यांना अटक करण्यापूर्वी 20 वेळा विचार केला पाहिजे, सर्व पुरावे गोळा केल्यानंतर वस्तुस्थिती काय याचा विचार केला पाहिजे. ईडीने गृहपाठ करणे आवश्यक आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com