World Tourism Day: इंटरनेट नाही, पण सोशल मीडियावर हिट! नेटवर्क नसलेल्या कोकणातील गावांच्या सौंदर्याची कहाणी, 'कोकणी रानमाणसा'च्या शब्दांत

World Tourism Day 2025: आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या समृद्ध कोकण प्रदेशातील पर्यटन क्षेत्राने डिजिटल माध्यमांच्या बळावर घेतलेली भरारी पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
World Tourism Day
World Tourism DayDainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Tourism

कोकण! हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभे राहते निळ्याशार समुद्राचे, नारळी-पोफळीच्या बागांचे आणि हिरव्यागार सह्याद्रीच्या डोंगररांगांचे चित्र. पण याच कोकणचे एक असे रूप आहे, जे आधुनिक जगापासून दूर, नेटवर्कच्या (Network) झगमगाटापासून अलिप्त आहे. याच अस्सल, ग्रामीण आणि निसर्गरम्य कोकणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचं काम एका तरुणानं केलं आहे, तो म्हणजे 'कोकणी रानमाणूस' (Konkani Ranmanus) - प्रसाद गावडे.

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडेची कथा लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. चांगल्या पगाराची इंजिनिअरची नोकरी त्याला सहज शक्य होती, पण त्याचे मन नेहमी कोकणच्या मातीकडे ओढले गेले. शहरांमधील धावपळीचे, कृत्रिम जीवन सोडून त्याने आपल्या गावाकडे परतण्याचा आणि निसर्गाच्या कुशीत राहण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय केवळ एक 'नोकरी सोडण्याचा' नव्हता, तर तो एक 'जीवनशैलीचा स्वीकार' होता. त्याने स्वीकारले साधे, नैसर्गिक आणि शाश्वत जीवन. जंगलात राहणाऱ्या, निसर्गाशी जुळवून घेणाऱ्या, कोणत्याही कृत्रिम सुविधांची अपेक्षा न करणाऱ्या माणसाला तो 'रानमाणूस' मानतो. अशाच जीवनशैलीचा स्वीकार करून त्याने स्वतःची ओळख 'कोकणी रानमाणूस' म्हणून निर्माण केली.

World Tourism Day
Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

प्रसाद गावडेच्या कामाची सर्वात मोठी गंमत हीच आहे की, तो राहतो अशा ठिकाणी जिथे मोबाईलचे नेटवर्क (Mobile Network) नीट मिळत नाही, पण त्याचे व्हिडिओ आणि त्याचे विचार मात्र जगभर 'हिट' आहेत.

YouTube व्लॉग्स व Instagram रील्समुळे दिवेआगर, आंजर्ले, वेळास, गुहागर, किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखी ऐतिहासिक व नैसर्गिक ठिकाणे पर्यटन नकाशावर झळकू लागली आहेत. अनेकदा ज्यांना केवळ स्थानिक मंडळीच ओळखत होती अशी मंदिरे, धबधबे, किल्ले आणि समुद्रकिनारे आज डिजिटल माध्यमामुळे जागतिक पर्यटकांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये सामील झाले आहेत.

डिजिटल क्रांतीचे खरे हिरो म्हणजे स्थानिक व्लॉगर्स आणि रिल्स स्टार्स. ते केवळ व्हिडिओ बनवणारे नसून, पर्यटकांना माहिती, मार्गदर्शन व स्थानिक अनुभव देणारे आधुनिक डिजिटल गाईड्स ठरत आहेत.

अनेक तरुणांनी गाव सोडून शहरात न जाता सोशल मीडियावर कोकणची सुंदरता जगभरात पोहोचवण्याचे काम हाती घेतले आहे. स्थानिक बोली, विनोद, कथा व लोककला यांच्या मिश्रणातून ते कोकणाला एक वेगळी ओळख देत आहेत. यामुळे कोकणातील तरुणांना रोजगाराचं नवीन साधन मिळत आहे, तर स्थानिक हॉटेल्स, होमस्टे व पर्यटन उद्योगालाही थेट लाभ होत आहे.

प्रसिद्ध इन्फ्लुएंसर प्रसाद गावडे याच्याशी झालेल्या खास संवादात त्यांनं कोकण पर्यटनाबाबतचे आपले विचार मांडले. ते म्हणाले, "आज Instagram, YouTube आणि Travel Blogs मुळे कोकण पर्यटनाला नवी उभारी मिळाली आहे. आम्ही फक्त दृश्ये दाखवत नाही, तर कोकणातील जीवनशैली, साधेपणा आणि निसर्गाशी असलेलं नातं याचीही कहाणी सांगतो."

"सध्या कोकणातील काही भागांत रस्ते व नेटवर्कचा अभाव आहे, तरीही पर्यटक इथे येतात कारण विकास कमी असल्यामुळेच येथील निसर्गाचं खरं सौंदर्य टिकून आहे. शहरांमध्ये पैसा मिळतो, पण निसर्ग हरवतो. आम्हा कोकणी लोकांना पैशावर आधारित नव्हे तर निसर्गावर आधारित जीवनशैली जगायची आहे." असं प्रसाद म्हणाला

World Tourism Day
Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

शाश्वत पर्यटनाचा संदेश

कोकण हा केवळ समुद्रकिनारे आणि बीचेसपुरता मर्यादित नाही, तर सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिरवीगार जंगलं, झरे आणि जैवविविधतेचा खजिना येथे दडलेला आहे. आंबोलीतील दुर्मीळ वनस्पती, देवबागच्या संगमाचे अप्रतिम दृश्य किंवा चौकुळच्या पठारावरचे रमणीय निसर्गरंग या सगळ्या कोकणाच्या वैशिष्ट्यपूर्ण संपदा आहेत.

प्रसाद गावडे यांचा संदेशही स्पष्ट आहे की, "पर्यटकांनी कोकणात येऊन फक्त बीच न पाहता येथील जीवनशैली, शेती, खाद्यसंस्कृती अनुभवायला हवी. मोठ्या हॉटेल्सपेक्षा मातीच्या घरात राहून गावकुसाचा अनुभव घ्यावा, हाच खरा कोकण आहे."

आज कोकणातील अनेक गावांमध्ये होमस्टे संस्कृती वेगाने वाढत आहे. पर्यटक गावकऱ्यांच्या घरात राहतात, स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेतात, अगदी शेतात जाऊन कामाचा अनुभव घेतात. यामुळे केवळ पर्यटनाचा व्यापारी फायदा होत नाही, तर गावकुसागणिक संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेलं नातं अधिक घट्ट होतं.

पर्यटनामुळे कोकणाला जागतिक ओळख मिळाली असली तरी काही आव्हाने पुढे उभी आहेत.

  • वाढत्या पर्यटनामुळे प्लास्टिक कचरा आणि प्रदूषणाचं संकट.

  • अतिक्रमण आणि अनियंत्रित बांधकामामुळे निसर्गाला धोका.

  • स्थानिक संस्कृतीत व्यावसायिकता शिरल्याने होणारा बदल.

यावर उपाय म्हणून शाश्वत पर्यटनाची धोरणं राबवणं, पर्यटकांना स्वच्छतेबाबत जागरूक करणं आणि स्थानिकांना पर्यटन नियोजनात सहभागी करणं गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com