Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Goa ITI Course: राज्‍यातील युवक-युवतींनी कौशल्‍याधारित शिक्षणावर भर द्यावा, यासाठी सरकारने गेल्‍या काही वर्षांपासून विविध मार्गांनी प्रयत्‍न सुरू केले आहेत.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आठवी आणि दहावी उत्तीर्ण झाल्‍यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्‍या (आयटीआय) केंद्रातून एक वर्षाचा कोर्स आणि एक वर्षाचे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण केलेल्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता यापुढे अनुक्रमे दहावी आणि बारावीच्‍या समांतर दर्जाची असेल.

मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

१. राज्‍यातील युवक-युवतींनी कौशल्‍याधारित शिक्षणावर भर द्यावा, यासाठी सरकारने गेल्‍या काही वर्षांपासून विविध मार्गांनी प्रयत्‍न सुरू केले आहेत.

२. ‘स्‍वयंपूर्ण गोवा २.०’ मध्‍येही सरकारने कौशल्‍य विकासाचा मुद्दा केंद्रस्‍थानी ठेवला होता.

CM Pramod Sawant
Drone Pilot Course: गोव्याच्या ITI मध्ये यंदापासून ड्रोन पायलट अभ्यासक्रम, रोबोटिक्स कोर्सही लवकरच

३.सरकारी नोकरीच्‍या मागे न लागता विद्यार्थ्यांनी कौशल्‍य शिक्षण घेऊन स्‍वयंरोजगार थाटावेत किंवा खासगी क्षेत्रातील नोकऱ्या मिळवाव्‍यात, यासाठी आठवी आणि दहावी उत्तीर्ण झाल्‍यानंतर दोन वर्षे आयटीआय कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावी उत्तीर्ण दर्जा देण्‍यात येईल.

CM Pramod Sawant
Mapusa ITI Peddem: गोव्यातील तरुणांसाठी आता 'सेंटर ऑफ एक्सलन्स'! म्हापसा आयटीआयतर्फे अभ्यासक्रम; काम लवकरच सुरू

४.त्‍यांना बोर्डकडून तसे प्रमाणपत्रही देण्‍यात येईल. त्‍याचा उपयोग त्‍यांना नोकरी मिळवण्‍यासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्‍यासाठीही होईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com