परमबीर सिंग यांची याचिका 21 ऑक्टोबरपर्यंत तहकूब

माजी पोलीस आयुक्त परमबीर (Parambir Singh) सिंह बेपत्ता झाले आहेत.
Parambir Singh
Parambir SinghDainik Gomantak
Published on
Updated on

माजी पोलीस आयुक्त परमबीर (Parambir Singh) सिंह बेपत्ता झाले आहेत. असे वक्त्यव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. ते रशियाला (Russia)पळून गेल्याची माहिती मिळत सूत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, 21 ऑक्टोबरपर्यंत एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही बळजबरीची कारवाई करणार नाही. अन्य एका प्रकरणात, राज्य सरकारने न्यायालयाला आश्वासन दिले की ते भारतीय पोलीस सेवेतील आणखी एक अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही.

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जामदार यांच्या खंडपीठाने सिंह यांच्याविरुद्ध ठाणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या त्यांच्या याचिकेवरील सुनावणी 20 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. त्यानंतर सिंह यांच्या वकिलांनी हे विधान केले. सिंह यांच्याविरोधात एप्रिलमध्ये ठाण्यात अनुसूचित जाती: अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण पोलीस निरीक्षक बी.आर. घाडजे यांच्या तक्रारीवरून तक्रार नोंदवण्यात आली. घाडजे अकोला पोलिसात तैनात आहेत.

Parambir Singh
माजी आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता...

अनुसूचित जाती समुदायाचे असलेले, घाडजे यांनी दावा केला की त्यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत कट रचला आणि खंडणीच्या खोट्या प्रकरणात त्यांना अडकवले जेव्हा त्यांनी काही आरोपींच्या बाजूने सिंगचे "बेकायदेशीर आदेश" पाळण्यास नकार दिला. सिंह यांच्याबद्दल माहिती मिळाली होती की ते देश सोडू शकतात, त्यानंतर त्यांच्या विरोधात लुकआउट नोटिस जारी करण्यात आला.

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही कार सापडल्याने सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरून काढून टाकण्यात आले. सिंग यांनी नंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com