दुष्काळी भागात पूर का येतोय?

पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेच आहे तसेच बहुतांश भागात पुरसदृश परिस्थिती झाली. 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे 100% नुकसान झाले.
Rain
Rain Dainik Gomantak

पश्चिम महाराष्ट्रानंतर गेल्या आठवड्यात मराठवाड्याच्या काही भागात अक्षरशा: पावसाने थैमान घालून हाहा:कार उडाला होता. शेतामध्ये (Agriculture)प्रचंड पाणी बसले होते. 15 हून नागरिकांचे जीव गेले, तसेच प्रचंड नुकसान झाले.

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal)गेल्या आठवड्यात गुलाब चक्रिवादळाचा (Hurricane)फटका मध्य भारत, महाराष्ट्र मराठवाडा या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मराठवाड्यात कहर झाला, असे हवामानशास्त्रीय कारण असावे.

परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठवाडा भागात ढगफुटीसदृश मोठ्या प्रमाणात पावसाची गारपिट, पूरांच्या (Flood)घटना वाढल्या आहेत.

Rain
Monsoon Impact: पावसाने उडवली दाणादाण, जनजीवन विस्कळीत

ज्या भागात नद्या वा ओढे कोरडे वाहात होते, ते आता पावसाने दुथडी भरुन वाहू लागले आहेत. थोड्याच काळात मोठा पाऊस पडेल असा हवामानशास्त्राच्या (Meteorological)भाषेत 'एक्स्ट्रीम इव्हेंट्स' (Extreme events)अधिक वारंवारतेने पाहायला मिळाले आहे.

नेहमी दुष्काळी प्रदेश म्हणून गणलेल्या भागात हे काय सुरु आहे?

जागतिक हवामान बदलाचे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम झाले आहेत का? मानवी जलव्यवस्थापनेचे काही परिणाम आहेत का? पण या सर्व शक्यतांची नोंदी घेणे आवश्यक आहे.

पावसाची नोंद?

बंगालच्या उपसागरात 'गुलाब' चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाची नोंद 'महारेन' (Maharen)या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत औरंगाबाद विभागात 643 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. जो की सरासरीच्या तब्ब्ल 125 टक्के इतका आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात तो 379 मिलीमीटरने नोंदला गेला.

सप्टेंबरपर्यंत 655 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरीच्या 97 टक्के, आणि 2019च्या तुलनेत तो 83 टक्के इतका होता.

Rain
Goa: मुसळधार पावसाने कोकण रेल्वे विस्कळीत

'Extreme events'ची करणे कोणती ?

अरबी समुद्रातून नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह तीव्र होता. पश्चिम घाटामुळे वारे अडकले आणि किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार होतो, ज्याला ऑफ शोअर ट्रफ म्हणतात.

पण दुसरे कारण जास्त महत्वाचे आहे ते असे की हवामानातील बदल:

जर गेल्या काही वर्षांतल्या नोंदी पाहिल्यात तर असे एक्स्ट्रीम इव्हेंट्स वाढलेले आहे आणि सोबतच बहुतांश पाऊस हा उत्तरेपेक्षा दक्षिण भारतात जास्त झाला आहे.

ऑफ शोअर ट्रफमुळे कोकण आणि घाटाच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. याचा परिणाम म्हणून तो घाटालगतच्या पूर्वेकडील काही भागातही मिळाला.

पुणेस्थित 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी'('Indian Institute of Tropical Meteorology') येथे जागतिक हवामान बदलाचा परिणाम करणारे केंद्रात संशोधन डॉ. रॉक्सी कोल यांच्या मते जेव्हा त्यांनी 1950 ते 2018 पर्यंत पावसाच्या नोंदींचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांच्या समोर आले की या प्रदेशातला एकूण पाऊस हा कमी होत गेला, पण या भागात 'एक्स्ट्रीम इव्हेंट्स'ची वारंवारता मात्र वाढली.

Rain
कोकणाला पावसाने झोडपले, सिंधुदुर्गला ऑरेंज तर रायगडला रेड अलर्ट

पूर परिस्थिती ही अतिवृष्टीने झाली की पाण्याच्या गैरव्यवस्थापनामुळे?

पावसामुळे त्याचा परिणाम शेतीवर झाला आणि त्याचे बदल झालेले आहेत हेही दिसून आले.

पण यंदा काही भागात जे घडले ते केवळ हवमान बदलामुळे असे म्हणता येईल का? काही पर्यावरणवाद्यांच्या मते या पूराचे हे पाण्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे ही झाले आहे.

हवामान बदलाचे परिणाम हे तात्पुरते नसून, त्यामुळे आता पुन्हा असाच पाऊस झाल्यानंतर मराठवाड्याच्याच नाही तर राज्यभरात सगळीकडेच याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनामध्ये योग्य कृती करणे गरजेचे आहे.

या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेच आहे तसेच बहुतांश भागात पुरसदृश परिस्थिती झाली. 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे 100% नुकसान झाले. नागरिकांचे घरे, (Home)रस्ते,(Road) पूल पाण्याच्या खाली जाऊन प्रचंड नुकसान झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com