शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

महाराष्ट्रातील राजकारण आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापनेबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.
Supreme Court
Supreme Court Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील राजकारण आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापनेबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. खरे तर, एकनाथ शिंदे सरकारच्या घटनात्मकतेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घ्यायचा आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवायचे की नाही, हेही यावेळीच ठरवायचे आहे. (Whose Shiv Sena Supreme Court hearing today)

Supreme Court
Patra Chawl Land Case: संजय राऊतांना ईडीचे समन्स, उद्या पुन्हा होणार चौकशी

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत आणि या सर्व प्रकरणांवर बुधवारी एकत्रित सुनावणी होणार आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी अॅडव्होकेट अनिश शहा यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, "याचिकाकर्ता 30 जून 2022 रोजी राज्यपालांच्या असंवैधानिक आणि बेकायदेशीर कृतीला आव्हान देत आहे.

याचिकेमध्ये म्हटले की, "शिवसेना हा निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. निवडणूक आयोगानेही आपल्या पदाधिकाऱ्यांना याबाबत मान्यता दिली आहे तर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. शेवटची संघटनात्मक निवडणूक 2018 मध्ये झाली होती आणि त्याचा अहवाल भारतीय निवडणूक आयोगाला देण्यात आला होता. शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत कोणताही बदल झालेला नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत कोणताही वाद नाहीये.

Supreme Court
Former Police Commissioner: माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आणि सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करणारा राज्यपालांचा ३० जूनचा निर्णय बाजूला ठेवण्याचे निर्देश देण्याची मागणी या याचिके्मध्ये करण्यात आली आहे. 3 जुलै रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेचे "बेकायदेशीर" कार्यवाही आणि त्यानंतरच्या अध्यक्षांची निवडणूक रद्द करण्याचे निर्देशही यावेळी मागितले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटातील आमदारांना दिलासा देताना, नवे सभापती सध्या कोणत्याही आमदारावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे सांगितले होते मात्र आपल्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, अशी तक्रार उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली होती.

महाराष्ट्रात ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अलीकडेच ज्येष्ठ नेते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या बंडाचा सामना करावा लागला आहे. पक्षाच्या बहुतांश आमदारांनी शिंदे यांची बाजू घेतली, ज्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. ठाकरे यांनी 29 जून रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com