आनंदराव अडसूळ
आनंदराव अडसूळDainik Gomantak

कोण आहेत आनंदराव अडसूळ? का होतीय ईडीची चौकशी

बॅंकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. परंतु आमच्या बँकेचा टर्नओव्हर 800 कोटींचा असून तो 900 कोटींचा घोटाळा कसा काय असेल असे अडसूळ म्हणाले.
Published on

मुंबई: आनंदराव विठोबा अडसूळ हे भारतीय (Indian)16 व्या लोकसभेचे (LokSabha)सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्राच्या अमरावती मतदारसंघाचे प्रथम प्रतिनिधि होते. आडसूळ हे शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत. तसेच ते 15 व्या लोकसभेच्या अमरावती मतदारसंघातून व 14 व्या लोकसभा, 13 व्या लोकसभा आणि 11 व्या लोकसभेत महाराष्ट्रातील बुलढाणा मतदारसंघाचे प्रतिनिधि म्हणून त्यांनी काम पहिले आहे.

कसा आहे अडसुळांनाचा कार्यकाळ:

1996 पासून याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. त्या वेळी ते 11व्या लोकसभेवर निवडून आले. ही त्यांची पहिली टर्म होती. यानंतर 1999 ला ते 13 व्या लोकसभेवर पुन्हा निवडून आले ही त्यांची दुसरी टर्म होती.

या पाठोपाठ ऑक्टोबर 1999-जुलै. 2002 मुख्य सचेतक, शिवसेना संसदीय पक्ष, लोकसभा,1999-2000 सदस्य, मानव संसाधन विकास समिती, 2000-2002 सदस्य, परिवहन आणि पर्यटन समिती, 2000-मार्च 2002 सदस्य, सल्लागार समिती, रेल्वे मंत्रालय(Ministry of Railways), जुलै 2002-ऑगस्ट 2002 नेते , शिवसेना संसदीय पक्ष, 26 ऑगस्ट 2002 मे 2004 केंद्रीय राज्यमंत्री(Union Minister of State), वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्रालय, 2009 15 व्या लोकसभेवर पुन्हा निवडून आले ही चौथी टर्म, 6 ऑगस्ट 2009 सदस्य, सार्वजनिक लेखा समिती, 31 ऑगस्ट 2009 सदस्य, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती(Petroleum and Natural Gas Committee), 23 सप्टेंबर 2009 - सदस्य, शासकीय (Govt)आश्वासनांवर समिती, 5 मे 2010 - सदस्य, सार्वजनिक लेखा समिती. पुन्हा एकदा 2014 साली ते 16 व्या लोकसभेवर निवडून आले ही 5 वि टर्म, 1 सप्टेंबर 2014 अध्यक्ष, रसायने आणि खते यावर स्थायी समिती, 2018 शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती असा त्यांचा कर्कल राहिला आहे.

आनंदराव अडसूळ
अनिल देशमुख यांना ED ची लुकआऊट नोटीस

ईडी कडून सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंक घोटाळा प्रकरणी चौकशी:

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ED ने समन्स बजावले आहे. ईडी कार्यालयात त्यांना हजर राहण्यासाठीची आदेश देण्यात आले आहेत. मात्र ते दिल्लीला (delhi)जाणार आहेत त्यामुळे ते ईडी कार्यलयात हजर राहाणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली. सिटी कोऑपरेटिव्ह बँकेतल्या (City Cooperative Bank)कथिक घोटाळ्यासाठी अडसूळ यांची याआधीही चौकशी केली होती.

अडसुळांची तब्बेत बिघडली:

ईडीचे अधिकारी चौकशीसाठी त्यांच्या घरी गेले होते. तीन ते चार तास यांची चौकशी सुरु होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेणार याची माहिती मिळताच अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स (Ambulance)बोलाविण्यात आली होती. मुंबईमधील गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये (Life Care Hospital)त्यांना दाखल करण्यात आले आहे.

आनंदराव अडसूळ
जॅकलीन फर्नांडीस ED कार्यालयात; मनी लॉंड्रींग प्रकरणात चौकशी सुरु

नक्की काय आहे हे प्रकरण:

अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील तर्क मोठे नाव आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकेचे कर्मचाऱ्यांची युनियन आहे. आणि या युनियनचे (Union)आनंदराव अडसूळ हे अनेक वर्षांपासून नेतृत्व करीत आहेत. अडसूळ यांची स्वतःची सहकारी बँक ही होती. ते सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष होते. तर त्यांचेच नातेवाईक हे संचालक मंडळावर काम करीत होते.

सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेचा सुमारे 1 हजार कोटींच्या आसपास टर्नओव्हर होता. मात्र ही बँक गेल्या दोन वर्षांपासून तोड्यात निघाली आहे. याचे कारण कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये झालेल्या घसरणीमुळे ही बँक तोड्यात आली आहे. आणि अखेरीस ती बँक बुडीत निघाली. बँकेचे हजारो सदस्य होते. अनेक पेन्शनचे खाते होते. तरीही सारे बुडाले आहे.

खातेदारांनी, ठेवीदारांनी अनेकदा अडसूळ यांना भेटून याबाबत मार्ग काढण्यासाठी भेटी घेतल्या. परंतु आनंदराव अडसूळ यांनी कोणाचेही ऐकले नाही. यामुळे अखेर खातेदारांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. खातेदारांचे आपले आपले पैसे परत मिळावे म्हणून अनेकदा त्यांनी मागणी केली. तरीही गेल्या दीड वर्षात खातेदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. तसेच अनेकांनी वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी, सीबीआय,(CBI) आरबीआय(RBI), आणि राष्ट्रपती (President)यांच्याकडे याबाबत तक्रारी दिल्या होत्या.

यानंतर अखेर ED ने याची दखल घेतलीच. आता ED कडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याच अनुषंगाने अडसूळ यासिनच्या निवासस्थानी आज सकाळी ED पोहचली आणि त्यांना नोटीस दिली. यापूर्वी ही ईडीकडून झालेल्या चौकशीत या घोटाळ्या संदर्भात त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. तसेच EDच्या अधिकाऱ्यानी जवळपास 3 तास चौकशी केली होती.

आनंदराव अडसूळ
ED चा बनावट आधिकारी बनून खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी सापळा लावून अटक

आनंदराव अडसूळ यांच्या वरील आरोप?

सिटी को-ऑप बँकेचा घोटळा केल्याचा आरोप 5 जानेवारीला बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केला. सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईत 13-14 शाखा आहेत.येथे बँकेत 900 पेक्षा जास्त खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास मुख्य कारणांपैकी अनधिकृतरित्या येथे अनेकदा कर्ज वाटली आहेत. असा आरोप रवी राणांनी केला आहे. आणि अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी सुद्धा भाड्याने दिली आहे.

ईडी आदेशानंतर आनंदराव अडसूळ काय म्हणाले?

माझ्यावर जे आरोप आहेत त्या ऑडिट प्रकरणात मी आणि माझ्या मुलाचा काही संबंध नाही. सकाळी ED चे अधिकारी घरी आले होते. त्यांनी मला नोटीस दिली. त्यानंतर त्यांना मी सांगितले की मी दिल्लीला जाणार आहे. मी या पूर्वी ED कार्यालयात चौकशीसाठी जाऊन आलो आहे. रवि राणा यांच्या पत्नी यांच्या केसची सुनावणी आल्या नंतर मला ED कडून नोटीस पाठवण्यात येते. रवी राणा हे सर्व मॅनेज करतात. त्यांचचे सरकार आहे, असा ही आरोप त्यांनी केला. बँकेतील खातेदार, ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंघाने बॅंकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. परंतु आमच्या बँकेचा टर्नओव्हर 800 कोटींचा असून तो 900 कोटींचा घोटाळा कसा काय असेल असेही अडसूळ म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com