जॅकलीन फर्नांडीस ED कार्यालयात; मनी लॉंड्रींग प्रकरणात चौकशी सुरु

Jacqueline fernandez: सध्या शिवसेना नेते अनिल परब आणि एकनाथ खडसे हे ईडीच्या रडारवर असतानाच अभिनेत्री जॅकलीनला ईडीची नोटीस आली असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होता आहेत.
Jacqueline fernandez
Jacqueline fernandezDainik Gomantak

प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची (Jacqueline fernandez) सध्या ईडी (ED) कार्यालयात चौकशी सुरु असल्याची माहिती मिळते आहे. जॅकलीनला ईडी कडून मनी लॉंड्रींग प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते आहे. मागच्या 5 तासांपेक्षा जास्त कालावधीपासून ईडीच्या कार्यालयात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची चौकशी सुरु असल्याचे समजते आहे. सध्या शिवसेना नेते अनिल परब आणि एकनाथ खडसे हे ईडीच्या रडारवर असतानाच अभिनेत्री जॅकलीनला ईडीची नोटीस आली असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होता आहेत. राजकीय क्षेत्रानंतर आता मनोरंजन विश्वातील देखील काही नावं ईडीच्या रडारवर असल्याचे दिसते आहे.

मुळ श्रीलंकन असलेल्या 36 वर्षीय जॅकलीन फर्नांडीसचा ​​उल्लेख करत प्रवर्तन संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले की, "जॅकलीन आरोपी नाही, मात्र साक्षीदार म्हणून सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात तीची साक्षीदार म्हणून चौकशी केली जाते आहे”. या प्रकरणात 24 ऑगस्ट रोजी, तपास यंत्रणांनी म्हटले होते की, त्यांनी चेन्नईतील समुद्रमुखी बंगला, ₹ 82.5 लाख रोख आणि डझनभर आलिशान कार जप्त केल्या आहेत.

दरम्यान, खासदार भावना गवळी या देखील ईडीच्या रडारवर असल्याचे दिसते आहे. भावना गवळी यांच्या वेगवेळ्या संस्थांवर ईडीकडून छापे मारण्यात आले असल्याचे समजते आहे. गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने आतापर्यंत छापे मारले असल्याचे समजते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com