"कोणतं हिंदुत्व...?": प्रियंका चतुर्वेदी यांचा एकनाथ शिंदे वर घणाघात

प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा पक्ष हिंदुत्वाच्या विचारसरणीपासून फारकत घेत असल्याचा दावा खोडून काढला.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा पक्ष हिंदुत्वाच्या विचारसरणीपासून फारकत घेत असल्याचा दावा खोडून काढला. त्या म्हणाल्या, "कोणते हिंदुत्व तुम्हाला तुमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायला शिकवते... तोही एक कुटुंबासारखा पक्ष?" प्रियंका चतुर्वेदी माध्यमाशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, "भाजप समर्थित" या विचारधारेबद्दल बोलणे हे बंडखोरीचे निमित्त आहे. (which hinduism are you talking about ss leader priayanka chaturvedi attacks eknath shinde)

दरम्यान, महाराष्ट्रात राजकीय महाभारत सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील बंड हळूहळू बळकट होत आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेने आता आणखी चार बंडखोर आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. ताज्या घडामोडींनुसार, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना आता 37 आमदारांचा पाठिंबा आहे, म्हणजेच पक्षांतरविरोधी कायदा त्यांना लागू होणार नाही. विधानसभेत ते पक्षाचे विभाजन करु शकतात.

Priyanka Chaturvedi
Maharashtra Politics: शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर कुणाचा दावा, वाचा सविस्तर

विशेष म्हणजे, शिवसेनेची (Shiv Sena) महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची (Congress) युती ‘अनैसर्गिक’ आहे. त्यामुळे भाजपसोबत पुन्हा युती केली पाहिजे, असे मत एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मांडले होते.

दुसरीकडे, प्रियंका चतुर्वेदी यांना विचारण्यात आले की, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर पक्षातील काही लोक नाराज आहेत. यावर त्या म्हणाल्या, "प्रत्येक राजकीय पक्ष मंथनातून जातो. विशेष म्हणजे पक्षाचे नेतृत्व कशाप्रकारे काम करते यावर ते अवलंबून आहे.'' राज्यात राजकीय चर्चा सुरु आहे. पुढे जाण्यासाठी राज्याचा मूड समजून घ्यावा लागेल. अटलबिहारी वाजपेयींचा भाजप पक्ष राहीलेला नाही.

Priyanka Chaturvedi
Maharashtra Political Crisis: ''...पंढरपूच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे"

प्रियंका चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, "त्यांच्याकडे दुसरे सर्वात महत्त्वाचे मंत्रालय होते. त्यांचा मुलगा खासदार आहे... शिंदे हे स्वतः एक ज्येष्ठ नेते आहेत. ज्यांना नगरविकास खाते देण्यात आले होते, जे मुख्यमंत्री सहसा त्यांच्याकडे ठेवतात."

तसेच, शिंदे यांच्यासोबत दिसणाऱ्या प्रत्येकाच्या संपर्कात असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे. आम्ही त्यांच्या सतत संपर्कात असून ते आमच्या संपर्कात आहेत, असेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com