Weather Update: राज्यात आज येलो अलर्ट; पुणे, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पावसाचा वेग मंदावला असला तरी काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Rain Updates
Rain UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात पावसाचा वेग मंदावला असला तरी काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Rain) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाचा वेग मंदावला असल्याने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये किंचीत घट झाली. (Weather Update Yellow alert in the state today Chance of heavy rain in Pune Mumbai)

Rain Updates
महाराष्ट्रात ED नंतर आयकराची दहशत, 2 ठिकाणी छापे टाकून 390 कोटींची रोख रक्कम जप्त

दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस आता कमी झाला असला तरी तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान पुणे, मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार सरींच शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

सध्या गुजरात ते उत्तर केरळच्या किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती आहे, तर सौराष्ट्रापासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रापर्यंत येत्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या स्थितीमुळे कोकणच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहून मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल मात्र, उर्वरित ठिकाणी हलका पाऊस पडेल, तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील.

Rain Updates
Swatantryacha Amrut Mahotsav: राष्ट्रगीत गातांना महाराष्ट्राच्या माजी सैनिकाचा मृत्यू

राज्यात 11 ऑगस्टपर्यंत 'यलो अलर्ट' पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर (घाट भाग), सातारा (घाट भाग), अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com