Swatantryacha Amrut Mahotsav: राष्ट्रगीत गातांना महाराष्ट्राच्या माजी सैनिकाचा मृत्यू

Swatantryacha Amrut Mahotsav चंद्रभान मालुंजकर यांनी 1962 च्या युद्धात भाग घेतला होता.
Swatantryacha Amrut Mahotsav
Swatantryacha Amrut MahotsavDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील नाशिक येथील एका शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमादरम्यान 81 वर्षीय माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर यांचा मृत्यू झाला. चंद्रभान मालुंजकर यांनी 1962 च्या युद्धात भाग घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर परिसरात राहणारे चंद्रभान मालुंजकर हे शाळेतील कार्यक्रमात अचानक बेशुद्ध पडले, त्यांना तात्काळ उचलून रुग्णालयात नेण्यात आले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कार्यक्रमात ज्येष्ठांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. तेव्हा हि घटना घडली या घटनेनंतर परिसरात सर्वत्र शोककळा पसरली.

Swatantryacha Amrut Mahotsav
Mumbai: 66 लाखांचा 266 किलो अमली पदार्थ जप्त; 4 तस्करांना अटक

कार्यक्रमादरम्यान घटनास्थळी उपस्थित लोक व्हिडिओ बनवत होते. व्हिडीओ पाहिल्यावर असे दिसून आले की, शाळेत राष्ट्रगीत सुरू असताना माडी स्वातंत्र्यसैनिकसुद्धा राष्ट्रगीत गात होते, तेव्हा अचानक त्यांना चक्कर आली. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीच्या आधी हे आयोजन करण्यात आले होते.

Swatantryacha Amrut Mahotsav
RBI ने महाराष्ट्रातील 'या' बँकेवर कारवाई करत अधिकृत परवाना केला रद्द

सेवानिवृत्त झाल्यानंतर 1962 च्या युद्धात सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या मालुंजकर यांनी सातपूर भागातील माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून तरुणांसाठी विविध उपक्रम राबवून तरुणांना सैन्यात भरती होण्याची प्रेरणा दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com