Weekend: तुम्ही या ठिकाणी फिरायला जाल तर फटके खाल...

अशातच आज शनिवार आणि उद्या रविवार तेव्हा सुट्टी (Weekend) म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं,
Weekend Tourism Place
Weekend Tourism PlaceDainik Gomantak

बेळगाव : देशात सगळिकडेच लॉकडाउन निर्बंध कडक केले आहेत कोरोना चा वाढता कहर बघता आणि तिसऱ्या लाटेची भीती या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने विेकेंड (Weekend) लॉकडाउनचे (Lockdown) नियम आणखी सक्तीचे केले आहे. अशातच आज शनिवार आणि उद्या रविवार तेव्हा सुट्टी म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी (Tourism Place) जायला आवडतं, पण तुम्हाला माहित आहे का तुम्हाला कुठे जाणं परवडणार आहे आणि कुठे नाही? (Weekend: It is forbidden to visit these tourist places in the country)

पावसाळ्यात विकेंडला फिरण्याची स्वप्न आपण पाहत असाल तर थांबा. आधी माहीती करून घ्या की, तुमच्यासाठी काय महत्त्वाची आहे. तुम्ही बेळगाव भागातील खानापूर आणि गोकाक तालुक्यातील पर्यटन स्थळी, पिकनिक पॉईंट, धबधब्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. कारण तेथे पर्यटनासाठी सरकराच्या नियमांअतर्गत बंदी घालण्यात आली आहे. कोरोना काळात पर्यटनस्थळी गर्दी करु नका असे आवाहन वारंवार लोकांना केले जात आहे. पण तरीही पर्यटन स्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसते. येथे कोरोना नियमांचा चांगलाच फज्जा उडतांना दिसतो. फक्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीच म्हणडे शनिवार-रविवार हे नियम लागू राहणार आहेत.

Weekend Tourism Place
जाणून घ्या केंद्र सरकार किती रुपयांत खरेदी करते Vaccine

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच अशा गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी हजारो पर्यटकांची गर्दी झालेली आपल्याला दिसते. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना ही बंदी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली आहे. सध्या राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नैसर्गिक ठिकाणांचे वातावरण अल्हाददायक झालेले पाहायला मिळते. त्यामुळे पर्यटन प्रेमींनाही मोह अनावर होतो आणि ते भटकंतीला निघतात. आणि याच कारणामुळे प्रशासानाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून पर्यटन स्थळ, पिकनिक पॉईंट, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे.

या ठिकाणी जाण्यास बंदी असणार आहे.

खानापूर : चिखले, चिगुळे, कणकुंबी, किरावळे, वज्र (वज्रा / वज्रपोहा), मान, सातोडा तसेच पारवाड व ईतर ठिकाणी जाता येणार नाही. गोकाक येथील गोकाक धबधबा (Gokak falls) आणि गोडचींमलकी धबधबा (Godachinmalki / Markandeya Falls) तसेच धूपदाळ धरण या ठिकाणी जाण्यास बेळगांव जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.

एकीकडे डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाउनचे कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. असं असूनही काही भागातील धबधब्यावर लोकांची गर्दी होतेच आहे. अशा बेफिकिरीने नागरिक वागत असतील तर कोरोनाला आळा घालणार कसा असा प्रश्न ही गर्दी बघून उपस्थित होतो आहे.

Weekend Tourism Place
गोवा-कर्नाटक सीमेलगतचा दुधसागर धबधबा कॅसलरॉकपासून 13 कि.मी. अंतरावर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com