तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांचा इशारा

देशाच्या 75 व्या स्वातंत्रदिनाच्या (75thIndependenceDay) पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात धवजारोहण संपन्न झाले
Uddhav Thackeray warns state about lockdown
Uddhav Thackeray warns state about lockdownDainik Gomantak
Published on
Updated on

देशाच्या 75 व्या स्वातंत्रदिनाच्या (75thIndependenceDay) पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात धवजारोहण संपन्न झाले यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत ज्यांनी हे स्वातंत्र मिळवण्यासाठी कष्ट सोसले, आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व क्रांतिवीर आणि शहिदांना अभिवादन देखील केले.(Uddhav Thackeray warns state about lockdown)

तसेच विषमतेतून बाहेर पडत स्वराज्य आणि स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ आपल्या सर्व महापुरुषांनी आपल्याया सांगितला आहे.असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे त्या अधिकाऱ्यांचे कौतुक करता मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन देखील केले आहे.

आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्याला एका इशाराही दिला आहे उद्यापासून आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. मात्र कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. त्यामुळं काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण निर्बंध शिथिल करतोय मात्र पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आतापासून खबरदारी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray warns state about lockdown
"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास": मोदींचा नवीन नारा

त्याचबरोबर त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी राज्याने कश्याप्रकारे आरोग्यसुविधा बळकट केली आणि लसीकरणातही नवीन टप्पा गाठत काल राज्यानने साडेनऊ लाख लोकांना लसीकरण करून एक वेगळा उच्चांक गाठला असल्याचेही सांगितले आहे. तसेच ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांनी पराक्रमाची शर्थ करत देशाला हा दिवस दाखवला आहे त्याचप्रमाणे गेल्या दीड वर्षात आरोग्य विभाग आणि आपल्या करोना योद्ध्यांनी देखील पराक्रमाची शर्थ केली आहे. आपलं रक्षण करता करता या युद्धात ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com