मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Uddhav Thackeray Birthday News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडुन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Eknath Shinde and  Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackerayDainik Gomantak

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना असे म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणे एकनाथ शिंदे यांनी टाळले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला. यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कालच्या भागातही त्यांनी शिंदे आणि बंडखोरांवर टीका केली होती. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिंदे नेमके कशा शुभेच्छा देतात,याकडे लक्ष लागले होते.

Eknath Shinde and  Uddhav Thackeray
श्रावणाआधी Gatari Amavasya साजरी करण्यामागील वैज्ञानिक कारण माहिती आहे का?

उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत म्हटलं 'प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान... उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे. आता या टीकेला शिंदे नेमकं काय उत्तर देतात याकडे लक्ष लागून आहे.

फक्त शुभेच्छा द्या; उद्धव ठाकरेंचे आवाहन
शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com