Twelfth examination paper truck caught fire on Nashik-Pune highway
Twelfth examination paper truck caught fire on Nashik-Pune highwayDainik Gomantak

नाशिक-पुणे महामार्गावर बारावी परिक्षा पेपरच्या ट्रकला लागली आग

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वी (HSC) परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकला बुधवारी सकाळी आग लागली.
Published on

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वी (HSC) परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकला बुधवारी सकाळी आग लागली, त्यात सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक (Maharashtra State Secondary) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Higher secondary education) पुणे विभागाच्या प्रश्नपत्रिका मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) महाराष्ट्रात (Maharashtra) आणल्या जात होत्या मात्र त्या ट्रकाला येतानाचं आग लागली. (Twelfth examination paper truck caught fire on Nashik-Pune highway)

Twelfth examination paper truck caught fire on Nashik-Pune highway
कारवाई की ‘कार्यक्रम’?

राज्य मंडळाच्या बारावीच्या ऑफलाइन परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहेत तर, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, "अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर घाटाजवळ नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. आगीमुळे विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका जळून खाक होऊन रस्त्यावर विखुरल्या होत्या.

अहमदनगरचे (Ahmednagar) पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, ही घटना सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक पुढे जात असताना त्यातून धूर येऊ लागला होता, चालक आणि त्यातील इतर लोकांनी ट्रकमधून वेळप्रसंगी उडी मारली. काही वेळातच ट्रकला आग लागली आणि प्रश्नपत्रिका जळून खाक झाली. पाटील म्हणाले की, आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com