Konkan Railway: होळी उरकून मुंबईला जात होता परत, रेल्वेत चढताना निसटला हात अन् गमावला जीव

Konkan Railway Accident: होळीचा सण उरकून तो मुंबईला कामावर परत जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाला होता.
Konkan Railway Accident
Konkan Railway Dainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway

रत्नागिरी: होळीचा सण उरकून मुंबईला परत जाताना ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रेल्वे पकडताना हात निसटल्याने रेल्वे खाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

रुपेश (पूर्ण नाव कळू शकले नाही) (वय ३५, रा. रत्नागिरी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रुपेश होळीसाठी गावी आला होता. दरम्यान, होळीचा सण उरकून तो मुंबईला कामावर परत जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होते.

Konkan Railway Accident
Goa Cabinet Reshuffle: अर्धा डझन मंत्र्यांची विकेट पडणार? मंत्रिमंडळ फेरबदलाचा मार्ग मोकळा, CM सावंत - शहांची दिल्लीत बैठक

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मुंबईला जाणारी सुपरफास्ट रेल्वे दाखल झाली. रुपेश आणि त्याच्या मित्रांनी रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. पण, रेल्वेत चढण्याच्या घाईत रुपेशचा हात निसटला आणि तोल जाऊन तो रेल्वेखाली कोसळला. यात रुपेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

होळीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात दाखल होत असतात. होळीनंतर विविध शहरातून आलेले चाकरमानी कामासाठी मूळ शहरत परत जातात. कोकणातून मुंबईसारख्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. दरम्यान, रत्नागिरी रेल्वे स्थानकांवर घडलेल्या घटनेने स्थानकांवर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दी आणि सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com