१८ व्या जागतिक मराठी संमेलनाला सुरुवात आली आहे. हे संमेलन पुण्यात सुरु आहे.यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी अनेक बाबींवर स्वत:चे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर, पंतप्रधानांच्या नोकरी- उद्योगधंद्यावरील भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात( Gujrat ) आहेत म्हणून सर्व उद्योगधंदे , नोकऱ्या गुजरातला नेणे योग्य नाही, हे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, 1-2 उद्योग राज्याबाहेर गेल्याने राज्याला काही फरक पडत नाही. सरकारच्या चांगल्या गोष्टींचेही मी कौतुक केले आहे.
परंतु मोदीं(Modi)नी सर्व राज्यांना न्याय द्यावा. त्याचबरोबर सध्याच्या राजकारणावर बोलताना आत्ताचे राजकारण फक्त बडबडण्याचे राजकारण आहे. राजकारणी मोठ्या मनाचा असावा लागतो. राजकारण म्हणजे फक्त निवडणूक(Election ) लढवणे नाही, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
राजकारणाबद्दल वडिलांनी आणि बाळासाहेबांनी शिकवले. माझ्या जडणघडणीत बाळासाहेबांचा मोठा हात आहे, अशा भावनाही त्यांनी या मुलाखतीदरम्यान व्यक्त केल्या आहेत. व्यंगचित्रावर बोलताना व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.