Supari : कोकणातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं; सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 890 हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड
Areca nut (Supari)
Areca nut (Supari)Dainik Gomantak
Published on
Updated on

संपूर्ण जगात सुपारीचे उत्पादन भारतात केले जाते. कोकण पट्ट्यात सुपारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. एका आकडेवारीनुसार, जगातील 50 टक्के सुपारीचे उत्पादन भारतात होते. पान गुटख्यापासून ते धार्मिक कामांपर्यंत त्याचा वापर केला जातो. मात्र, आता त्याच सुपारीवर कोकणात गळ रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहे.

Areca nut (Supari)
Mayem Lake : मयेतील पर्यटनाला तब्बल 8 वर्षांनंतर पुर्नवैभव; गोवा टुरिझमचा पुढाकार पुनर्वैभव

कोकण म्हटलं की, नारळ, सुपारीच्या बागा, नीळाशार समुद्र असे चित्र समोर येते. येथील शेतकरी हा सुपारी, नारळ, काजु, कोकम, आंबा या पिकांचे उत्पादन घेतो. सुपारीची झाडे नारळासारखी 50-60 फूट उंच असतात आणि एकदा लागवड केल्यास 7-8 वर्षात फळ मिळायला सुरवात होते आणि अनेक दशके उत्पन्न होत राहाते. मात्र, आता या सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. 

Areca nut (Supari)
Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्नी कन्नड धनगर समाजाचाही गोव्याला पाठिंबा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: 890 हेक्टर क्षेत्रावर सुपारीचा लागवड करण्यात येते. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये सुपारी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात 70 टक्क्यांहून अधिक सुपारी पिकाची गळ झाली आहे. अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं सुपारीवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. गळ लागलेल्या सुपारीला बाजारात योग्य तो भाव देखील मिळत नाही. दर मिळत नसल्यानं सुपारी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com