Maharashtra Governor: महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी 'या' तीन नावांची चर्चा...

काही दिवसांपुर्वीच भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केली होती राजीनामा देण्याची इच्छा
Maharashtra Governor | BhagatSingh Koshyari
Maharashtra Governor | BhagatSingh Koshyari Dainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Governor: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून महाराष्ट्राचे पुढचे राज्यपाल कोण असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी देशातील तीन नावांवर चर्चा होत आहे.

Maharashtra Governor | BhagatSingh Koshyari
Maharashtra Weather: 'कुठे ऊन तर कुठे पावसाच्या हलक्या सरी', पहा हवामान खात्याचा अंदाज

भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून ओम माथूर आणि लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची नावे चर्चेत आली आहेत. तथापि, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शिवाय आणखी एका नावावर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होत असून ते नाव आहे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे. अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. नंतर त्यांनी पंजाब लोक दल नावाचा पक्ष काढला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलिन केला होता.

दरम्यान, ओम माथूर आणि सुमित्रा महाजन यांचा महाराष्ट्राशी संबंधही आहे. सुमित्रा महाजन सध्या मध्यप्रदेशात राहत असल्या तरी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. तर ओम माथूर हे २०१४ मध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते.

Maharashtra Governor | BhagatSingh Koshyari
PM Narendra Modi: खरंच, पंतप्रधान मोदी तामिळनाडुतून निवडणूक लढवणार?

काही दिवसांपुर्वीच राजभवनाच्या निवेदनात कोश्यारी यांनी आपले उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर फुरसतीच्या कामांमध्ये घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यांनी म्हटले होते की, संतांची, समाजसुधारकांची आणि शूर सेनानींची भूमी - महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा राज्य सेवक किंवा राज्यपाल म्हणून काम करणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानजन आणि विशेषाधिकार होता.

गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील जनतेकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी मी कधीही विसरू शकत नाही. माननीय पंतप्रधानांकडून मला नेहमीच प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे.

दरम्यान, कोश्यारींच्या या निवेदनावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. राज्यपाल राष्ट्रपतींकडे राजीनामा देत असतात, पंतप्रधानांकडे नाही, असे म्हणत सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका झाली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. विरोधकांनी त्यांच्यावर वारंवार पक्षपातीपणाचा आरोपही केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com