Maharashtra Weather
Maharashtra WeatherDainik Gomantak

Maharashtra Weather: 'कुठे ऊन तर कुठे पावसाच्या हलक्या सरी', पहा हवामान खात्याचा अंदाज

कोकण किनार पट्टीसह लगतच्या गोवा राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते.

Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात बराच बदल झालेला अनुभवायला मिळतोय. काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.

कोकण किनार पट्टीसह लगतच्या गोवा राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

Maharashtra Weather
Kolhapur: कोल्हापूरात पाण्याच्या भांड्यासहित महिला रस्त्यावर, नेमकं काय आहे प्रकरण

बदलत्या हवामानाचा पिकांना फटका:-

सध्या सततच्या बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाअसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसतेय.

तसेच पावसाळी वातावरण राहिल्यास कोकणातील आंबा काजू पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com