पुणे: भारतातील (India) पहिले सहकार विद्यापीठ सहकाराची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra) आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे (Pune) शहरात उभारण्यात यावे अशी मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.
दिल्लीत देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी देशामध्ये सहकार विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. आणि राज्यातील सहकार क्षेत्राकडून या घोषणेचे स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर विद्याधर अनास्कर यांनी सरकार मत्री अमित शहा यांच्याकडे राज्यात सहकार विद्यापीठ उभारण्याची मागणी केली आहे.
सहकार विद्यापीठ लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी सध्याचे वैकुंठभाई मेहता सहकार प्रबोधिनीचे रुपांतर सहकार विद्यापीठामध्ये करण्याचा पर्याय सुचवला आहे. देशातील पहिले सहकार विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करण्याचा प्रथम प्रस्ताव आम्ही सन 2014 मध्ये राज्य शासनाला दिला होता. त्यानंतर पुन्हा सन 2017 मध्ये तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या शिफारशीने तो पुनश्च राज्य सरकारकडे पाठविला असता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तत्त्वत: मान्यही केला होता," असे अनास्कर माहिती देताना बोलत होते.
पुढे राज्य सहकारी बँकेने यासाठी पुढाकार घेत पुण्यातील मार्केट यार्ड भागातील भू-विकास बँकेची जागा 25 कोटी रुपयांना विकतही घेतली होती. मात्र, दुर्दैवाने संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने सहकार विद्यापीठाची संकल्पना मूर्त स्वरुपात येऊ शकली नाही, अशी खंतही अनास्कर यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.