प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. महाराष्ट्र सरकार दोघांच्या विरोधात न्यायालयात (Court) जाणार असून त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करणार आहे.
दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी रविवारी माध्यमाशी बोलताना याबाबतची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दोघांच्या मीडिया स्टेटमेंटची क्लिप पाहिल्यानंतर न्यायालयाचा अवमान झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दोघांचे वक्तव्य जामिनासाठी घालण्यात आलेल्या अटींचे स्पष्ट उल्लंघन करणारे आहे.
वकील सत्र न्यायालयात अर्ज करतील
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी विशेष सरकारी वकील जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत. विशेष म्हणजे जामीन मंजूर करताना न्यायालयाने राणा दाम्पत्याला या प्रकरणाबाबत माध्यमांशी न बोलण्याची अटही घातली आहे. याशिवाय इतरही अनेक अटी घालण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन करण्यासाठी दाम्पत्याला सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात सहकार्य करणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करु नका. त्याचवेळी पोलिस (Police) सांगतील तेव्हा कोणत्याही काराणाशिवाय हजर राहणार आहेत. मात्र रविवारी रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी माध्यमाशी संवाद साधला.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, ''प्रभू राम आणि हनुमानाचे नाव घेतल्यामुळे ठाकरे सरकारने (Government) केलेल्या कारवाईला जनताच उत्तर देईल. परंतु रामाचे नाव घेणे गुन्हा असेल तर सरकारने मला 14 वर्षे तुरुंगात टाकावे. यासाठी 14 दिवस काय, वर्षभर तुरुंगात राहायला मी तयार आहे.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.