Maharashtra School Reopen: सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार; ठाकरे मंत्रीमंडळाचा निर्णय

स्थानिक पातळीवरील सीईओ, कलेक्टर किंवा आयुक्तांना शाळा सुरू करण्याचे अधिकार
Maharashtra School Reopen
Maharashtra School ReopenDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून सर्वच स्तरांतून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली होती. राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे शालेय शिक्षण विभागानं प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितलं होतं. यामध्ये येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पण स्थानिक प्रशासनानं याबाबत निर्णय घ्यावा असंही या प्रस्तावात म्हटलं आहे. (Latest News on Schools Reopening in Maharashtra)

Maharashtra School Reopen
Bulli Bai App Case मध्ये आणखी एक जण गजाआड, मुंबई सायबर सेलची कामगिरी

करोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र ओमायक्रॉन (Omicron) विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा (School) आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून केवळ इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवण्यास सम्मती देण्यात आली होती.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, स्थानिक परिस्थितीनुसार अंगणवाडी ते बारावी पर्यंतचे सर्व शाळा सुरू होणार आहे. तसंच या संदर्भातील निर्णयाचे सर्व अधिकार हे स्थानिक प्रशासनाकडे असतील असंही स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांची समंती आवश्यक असून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचंही यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.(Varsha Gaikwad on Schools Reopening)

Maharashtra School Reopen
Amar Naik Shooting Case: मुख्य आरोपी लवकरच होणार गजाआड

याशिवाय शाळेत जाऊन 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करता येईल का या संदर्भात माहीती घेत आहोत अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत असं स्पष्ट केलं आहे. मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. एक निर्णय घेतो म्हणून दुसऱ्याने घेतलाच पाहिजे असं न करता स्थानिक स्थिती लक्षात घेऊन त्यानुसारच निर्णय घ्यावा, असं यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

महत्वाचं म्हणजे शाळा किंवा महाविद्यालय सुरू करताना ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल अशा स्थानिक पातळीवरील सीईओ, कलेक्टर किंवा आयुक्तांना शाळा सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com