Bulli Bai App Case मध्ये आणखी एक जण गजाआड, मुंबई सायबर सेलची कामगिरी

मुंबईच्या (Mumbai) सायबर सेलने बुल्लीबाई अ‍ॅप प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. नीरज सिंग असे ओडिशातून पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
Bulli Bai App Case
Bulli Bai App Case Dainik Gomantak

मुंबईच्या सायबर सेलने बुल्लीबाई अ‍ॅप प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. नीरज सिंग असे ओडिशातून पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांची ही चौथी अटक आहे. यापूर्वी या प्रकरणी 21 वर्षीय नीरज बिश्नोई या अ‍ॅपचा निर्माता असून त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. नीरजने पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, तेव्हापासून कोठडीतच त्याची काळजी घेतली जात आहे. त्याचवेळी मुंबई (Mumbai) पोलिसांच्या (Police) सायबर सेलने विशाल कुमार झा, श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना आधीच अटक केली होती. या प्रकरणात तिघांचाही नीरजसोबत सहभाग होता.

दरम्यान, मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करुन त्यांचा लिलाव करणारे बुल्ली बाई अ‍ॅप गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तयार करण्यात आले होते. डिसेंबरमध्ये हे अ‍ॅप अपडेट करण्यात आले होते. बुल्लीबाई मोबाईल ऍप्लिकेशनवर शेकडो मुस्लिम महिलांची नावे "लिलावासाठी" ठेवण्यात आली होती. आणि विशेष म्हणजे त्यांचे फोटोही विनापरवाना लावण्यात आली होती. फोटोंमध्येही छेडछाड करण्यात आली.

Bulli Bai App Case
मुस्लिम महिलांचा लिलाव करणाऱ्या Bulli Bai अ‍ॅपवर जावेद अख्तर संतापले

अलीकडेच या प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जामीन अर्जावर सुनावणी करताना नीरज आणि त्याच्या साथीदारांचा जामीन अर्ज फेटाळला होता. नीरज बिश्नोईच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, आरोपी हा 20 वर्षांचा मुलगा असून त्याच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, त्याने हे अ‍ॅप कोणत्याही महिलेची बदनामी करण्याच्या उद्देशाने बनवलेले नाही. मात्र त्याच्याकडून कोणतीही वसुली झालेली नाही, त्यामुळे त्याला मंजूरी देण्यात यावी.

यावर स्पेशल सेलच्या IFSO युनिटने असा युक्तिवाद केला होता की, मुस्लिम महिलांचे फोटो टाकून या अ‍ॅपचा लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ज्या ट्विटर अकाउंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले होते, ते ट्विटर अकाउंट आरोपीचे आहे, त्यामुळे जामीन मंजूर करु नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com