महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आलीय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) बफर झोनमध्ये शनिवारी 4 वाघांच्या पिल्लांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वन प्रशासनाने सांगितले की, शावकांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. यावरून कुठल्यातरी वाघाने त्यांना ठार केल्याचे दिसून येते. मात्र एकाचवेळी वाघाच्या ४ पिल्लांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी माहिती देताना सांगितले की, "शनिवारी बफर झोन शिवनी वन परिक्षेत्रात तीन ते चार महिने वयाच्या दोन नर आणि दोन मादी पिलांचे मृतदेह आढळून आले. कम्पार्टमेंट क्रमांक 265 मध्ये मृतदेह दिसले होते, तिथे 30 नोव्हेंबरला वाघिणी (T-75) देखील मृतावस्थेत आढळून आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या गुरुवारी सकाळी, येथील जिल्हा मुख्यालयापासून 189 व्या कंपार्टमेंटमध्ये T-60 वाघीण मृतावस्थेत आढळून आली आणि तपासणीदरम्यान वाघाच्या पंजाच्या खुणाही आढळल्या. ही वाघीण सुमारे 6-7 महिन्यांची असून वाघाशी झालेल्या भांडणात तिचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती आहे. त्याचवेळी बुधवारी दुपारी शिवनी रेंजमध्ये टी-75 या प्रौढ वाघिणीचा मृतदेह त्याच अवस्थेत आढळून आला. मात्र तिचा वृद्धत्वामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असे वनपरिक्षेत्र प्रशासनाचे म्हणणे आहे.
मानव- वन्यजीव संघर्ष - चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे. वाढलेला संघर्ष कमी करण्यासाठी सरकार वाघाचे स्थलांतरण करायचे का असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांमधून त्याला विरोध केला होता. त्यामुळे हा प्रस्तावाला महाविकास आघाडी सरकारने रद्द केला होता.
महाराष्ट्रातील वाघांची स्थिती-
2006- 103
2010- 168
2014- 190
2020- 340
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.