महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसाच्या पठनावरुन चांगलंच गाजत आहे. यातच आज खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. राणा कुटुंबींयाना न्यायालयाकडून अद्याप दिलासा मिळाला नाही. जामिनासाठी पाच वाजेपर्यंत त्यांना प्रतिक्षा करावी लागली. सरकारी कामात अडथळा आणणे आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी राणा कुटुबींयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामिनाबाबत आज सत्र न्यायालयामध्ये (Court) सुनावणी पार पडली. न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु न्यायाधीश राहुल रोकडे यांनी यावर अद्याप कोणताही निकाल दिला नाही.
नेमंक काय प्रकरण?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसाचं पठन करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी राणा कुटुंबीय मुंबईत दाखलं झालं होतं. त्यामुळे शिवसैनिक आणि राणा कुटुंबीय यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. हजारो कार्यकर्ते मातोश्रीबाहेर पहारा देत होते.
दरम्यान, राणा कुटुंबीयांनी प्रक्षोभक वक्तव्य करुन कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. गेल्या एका आठवड्याहून अधिक काळापासून राणा कुटुंबीय न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भारतीय दंड संहितेच्या 124 अ नुसार राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणे, आणि थेट सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याचबरोबर, समाजात दरी निर्माण करणे, थेट सरकारला आव्हान देणे यामुळे राणा कुटुंबीयाविरोधात आम्ही भारतीय दंड सहितेमधील 124 अ अंतर्गत कलम लावले, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. सरकारी व्यवस्था कोलमडावी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा या उद्देशाने राणा कुटुंबींयांनी हे कृत्य केले होते, त्या अर्थाने राजद्रोह होतो, असे घरत यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.