राणा दाम्पत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर अखेर सुनावणी झाली. वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात राणा दाम्पत्याची बाजू मांडली
Navneet Rana And Ravi Rana
Navneet Rana And Ravi RanaDainik Gomantak
Published on
Updated on

गेले काही दिवस हनुमान चालीसा आणि नमाज पठणाचा भोंगा यावरून महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात राणा दाम्पत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक (Shivsena) आक्रमक होत राणा यांच्या घरी जाण्याची भाषा करत होते तर नवनीत राणा मातोश्रीवर जाणार असल्याचे म्हणत होते. याच मुद्द्यावरून हे प्रकरण शिगेला पोहोचले असून मातोश्रीवर जाण्याचा हट्ट आणि मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले बंड आता राणा दाम्पत्याला महागात पडला आहे. (Rana couple remanded in judicial custody for 14 days)

Navneet Rana And Ravi Rana
'नको म्हटले तरी आले अन् तुरुंगात गेले': उपमुख्यमंत्री अजित पवार

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना पोलिसांनी अटक केली आहे. खार पोलिसांनी ही कारवाई करत 153 अ या कलमाखाली राणा दाम्पत्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. आक्रमक वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच आज राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर वांद्रे कोर्टात सुनावणी झाली आहे तर वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात राणा दाम्पत्याची बाजू मांडली आहे. राणा दाम्पत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात राणा दाम्पत्याची बाजू मांडली. 29 एप्रिलपर्यत राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचा युक्तीवाद 29 एप्रिल रोजी करणार आहे. तोपर्यंत राणांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहात असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com