Sameer Panditrao
मुंबई गोवा महामार्गावर राजापूर शहर लागतं.
राजापूरपासून अगदी जवळ धोपेश्वर हे गाव आहे.
या गावात धूतपापेश्वर हे महादेवाचे पवित्र स्थान आहे.
हे पुरातन मंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे.
मंदिरालगत नदीचा प्रवाह आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यातून शेजारी पडणारा भव्य धबधबा दिसतो.
मुंबई गोवा महामार्गावरून राजापूर शहरात जाऊन तिथून धोपेश्वर पाच किमी अंतरावर आहे.