Sharad Pawar: NCP अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीने केला धमकीचा फोन

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
 Sharad Pawar
Sharad Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिली आहे. याप्रकरणी शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

 Sharad Pawar
Maharashtra: सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातही होती निर्भयाची गाडी-चित्रा वाघ

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलानं ठार मारणार असल्याचं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं फोनवर म्हटलं आहे. धमकी देणारी व्यक्ती हिंदीत बोलत होती. शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरने याबाबत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

 Sharad Pawar
Sindhudurg: गावात सरपंच भाजपचा नाही, तर एका रुपयाचा निधी देणार नाही; नितेश राणेंचा धमकी वजा इशारा

दरम्यान, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे फोन करुन जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती वेडसर असल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव नारायण सोनी असं आहे. शरद पवारांनी 2 डिसेंबर रोजी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून त्यांना दिवसाला किमान 100 फोन करत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com