Maharashtra: सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातही होती निर्भयाची गाडी-चित्रा वाघ

Maharashtra: निर्भया निधीतून महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या गाड्या मंत्र्यांनी वापरण्यावरुन राज्यात सध्या वाद सुरु आहे
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra:निर्भया निधीतून महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या गाड्या मंत्र्यांनी वापरण्यावरुन राज्यात सध्या वाद सुरु आहे. याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निर्भयासाठी मिळालेल्या गाड्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरल्याने टीका केली होती. राज्यातील महिलांच्या सुरक्षेपेक्षा नेत्यांची सुरक्षा महत्वाची आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसेच ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचेही म्हटले होते.

आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. " महाविकास आघाडीच्या काळात या निर्भया निधीतून महिला सुरक्षेसाठी गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या.या निधीतून 220 वाहने घेतली गेली होती. त्यापैकी 121 वाहने ही मुंबईतल्या 94 पोलीस स्टेशनला दिली.उरलेली 99 वाहने ही महाविकास आघाडीने स्वत:च इतर विभागांना वाटून टाकली ,असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे."

Goa BJP
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना जामीन मंजुर; पण मुक्काम तुरुगांतच?

त्याचबरोबर,या 99 मधल्या 9 गाड्या मंत्र्याच्या दावणीला होत्या. 12 गाड्या व्हीव्हीआयपी लोकांसाठी होत्या. छगन भुजबळ, सुनील केदार , सुनिल तटकरे , सुभाष देसाई यांच्याकडे या निर्भया निधीतील गाड्या होत्या. महत्वाचे म्हणजे, ज्यांनी हे आरोप केले आहेत त्या सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातदेखील या निर्भया निधीतील गाडी होती,असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. आता या आरोपांवर सुप्रिया सुळे काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com