Nitesh Rane
Nitesh RaneDainik Gomantak

Sindhudurg: गावात सरपंच भाजपचा नाही, तर एका रुपयाचा निधी देणार नाही; नितेश राणेंचा धमकी वजा इशारा

माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधीच देणार नाही.
Published on

Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg) सध्या ग्रांमपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. याच निमित्ताने ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी नितेश राणे हे नांदगावमध्ये प्रचाराला आले होते. नितेश राणे यांनी कणकवली (Kankavli) तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधीच देणार नाही. असे वक्तव्य नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.

Nitesh Rane
Raigad Accident: सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील खासगी क्लासच्या बसचा भीषण अपघात; दोन विद्यार्थी ठार

नितेश राणे यांनी केलेल्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात नितेश राणे ग्रामस्थांना थेट धमकी देताना दिसत आहेत. "जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल, त्यात गावाचा मी विकास करीन, नाहीतर करणार नाही स्पष्ट सांगतो. माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहेत. आपण लपाछपवीवाले नाही. राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक पोटात असं नाही. चुकून पण इथे माझ्या विचाराच्या सरपंच झाला नाही तर मी एकही रुपयांचा निधी देणार नाही. एवढी काळजी निश्चितपणे घेईन." असे नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना जामीन मंजुर; पण मुक्काम तुरुगांतच?

"जिल्हा नियोजन, ग्रामविकास, 25:15 निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो. हा निधी कोणाला द्यायचा त्याची सर्व सूत्रं माझ्या हातात आहेत. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री, कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत." असेही नितेश राणे म्हणाले. यावरून नितेश राणे यांच्यावर टीका होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, दोडामार्ग , कणकवली , कुडाळ, मालवण सावंतवाडी , वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com