The Kashmir Files: शरद पवारांनी सांगितली 90च्या दशकातील काश्मिरी राजकारणाची परिस्थिती

नरेंद्र मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असेल, तर त्यांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या 'द काश्मीर फाइल्स' (the kashmir files) वर केलेल्या वक्तव्यावरून भाजप (BJP) आणि आम आदमी (AAP) पार्टीमध्ये शब्दयुद्ध सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनाबद्दल खोटे चित्र देशात पसरवून “विषारी/भडकावू वातावरण” निर्माण केल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला.

Sharad Pawar
ठाकरे सरकार संकटात? कॉंग्रेसचे 25 आमदार करणार बंडखोरी

आपल्या पक्षाच्या दिल्ली युनिटच्या अल्पसंख्याक विभागाच्या अधिवेशनाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, "अशा चित्रपटाला प्रदर्शनासाठी मंजुरी मिळायला नको होती. मात्र त्यात करसवलत दिली जात असून देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी हा चित्रपट पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा चित्रपट लोकांना भडकवण्याचे काम करतो, ज्याला प्रोत्साहन दिले जात आहे."

यापूर्वी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या प्रमोशनवरून काँग्रेसनेही (Congress) भाजपवर हल्लाबोल केला होता. काँग्रेस पक्षाच्या संपर्क विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार चित्रपटाच्या माध्यमातून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. काश्मिरी पंडितांना खरे तर खोऱ्यातून पलायन करावे लागले होते, पण मुस्लिमांनाही त्याच पद्धतीने लक्ष्य केले गेले होते. जर भाजपला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असेल तर त्यांचे पुनर्वसन करा, असे राष्ट्रवादीचे प्रमुख पवार म्हणाले.

काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्यांसाठी पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असेल, तर त्यांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. अल्पसंख्याकांविरुद्ध लोकांमध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असेही मत पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीत शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. जवाहरलाल नेहरूंना काश्मीरच्या चर्चेत ओढत असल्याची टीकाही शरद पवार यांनी भाजपवर केली. खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले तेव्हा व्हीपी सिंग हेच पंतप्रधान होते आणि त्यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला.

Sharad Pawar
'आमदारांच्या घरावरून इतका विरोध होत असेल तर कदाचित तसं होणार नाही'

जगमोहन यांनी खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे स्थलांतर करण्यात मदत केली होती. व्हीपी सिंग सरकारला भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद सईद हे गृहमंत्री होते आणि जगमोहन, ज्यांनी नंतर दिल्लीतून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जगमोहन यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिला होता आणि राज्यपालांनीच काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पळून जाण्यास मदत केली होती, असा इतिहासही पवार यांनी यावेळी सांगितला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com