Maharashtra: शिंदे सरकारमधील 75 टक्के मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल- रिपोर्ट

महाराष्ट्राच्या नवीन सरकारच्या 75 टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
Maharashtra cabinet
Maharashtra cabinetTwitter
Published on
Updated on

Maharashtra Minister Criminal Cases: महाराष्ट्रात नवे सरकार तर स्थापन झाले, मात्र या सरकारचे काही लोकं समर्थन तर काही लोकं टीका करत आहेत. या मंत्रिमंडळात काही गुन्हेगार नेत्यांना मंत्रिपद देण्यात आल्याने राज्यातील जनतेने आणि विरोधी पक्षाने देखील शिंदे सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या नवीन सरकारच्या 75 टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील 75 टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या स्व-प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले.

अहवालानुसार, 15 (75 टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर फौजदारी खटले असल्याचे जाहीर केले आहे. 13 (65 टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक म्हणजे 18 गुन्हे दाखल झाले असून त्यात एका गंभीर प्रकरणाचा समावेश आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Maharashtra cabinet
मंत्रिमंडळाचा प्रश्न सुटला! स्वातंत्र्यदिनी कोणाच्या हस्ते ध्वजारोहण, 2 दिवसात नवीन पालकमंत्र्यांची घोषणा?

मंत्र्यांच्या मालमत्तेबाबत हा दावा करण्यात आला होता

अहवालानुसार, सर्व मंत्री कोट्यधीश आहेत आणि त्यांच्या मालमत्तेचे सरासरी मूल्य 47.45 कोटी रुपये आहे. एडीआरने म्हटले आहे की, "सर्वाधिक घोषित निव्वळ संपत्ती असलेले मंत्री मलबार हिल मतदारसंघातील मंगल प्रभात लोढा आहेत, त्यांच्याकडे 441.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सर्वात कमी घोषित निव्वळ संपत्ती असलेले मंत्री पैठण मतदारसंघातील भुमरे संदिपनराव आसाराम आहेत, ज्यांच्याकडे 2.92 कोटींची संपत्ती आहे. या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान दिलेले नाही.

शिंदेंचे मंत्री किती सुशिक्षित

अहवालात म्हटले आहे की, आठ (40 टक्के) मंत्र्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 10वी ते 12वी दरम्यान असल्याचे सांगितले आहे, तर 11 (55 टक्के) यांनी पदवी किंवा त्याहून अधिक उच्च शिक्षण घेतले असल्याचे घोषित केले आहे. त्यापैकी एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे. चार मंत्र्यांचे वय 41 ते 50 वर्षे आणि उर्वरित 51 ते 70 वर्षांचे आहेत.

Maharashtra cabinet
Shivsena Crisis: ठाकरे गटाची धाकधूक वाढली, धनुष्यबाणसंबधी कागदपत्र पूर्ततेसाठी 15 दिवसांची मुदत

मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान नाही

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा 40 दिवसांनी विस्तार करण्यात आला. ज्यामध्ये 18 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कोट्यातील नऊ मंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्ष भाजपच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिंदे सरकारला टीकेला सामोरे जावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com