मंत्रिमंडळाचा प्रश्न सुटला! स्वातंत्र्यदिनी कोणाच्या हस्ते ध्वजारोहण, 2 दिवसात नवीन पालकमंत्र्यांची घोषणा?

कधी होणार...कधी होणार...म्हणत अखेरीस दीड महिन्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तसेच एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
state government
state governmentDainik Gomantak
Published on
Updated on

कधी होणार...कधी होणार...म्हणत अखेरीस दीड महिन्यानंतर शिंदे सरकारच्या (state government) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तसेच एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजून खातेवाटप झाले नसले तरी पालकमंत्र्यांच्या नावाची दोन दिवसांमध्ये घोषणा करण्यात येणार आहे. याबद्दल आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Independence day flag hoisting by whom announcement of new guardian minister in 2 days)

state government
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात पहिल्यांदाच 40 दिवसांत झाला मंत्रिमंडळ विस्तार

शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेरीस 'कही खुशी कही गम' वातावरणात पार पडला आहे. एकूण 18 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली तसेच भाजप आणि शिंदे गटातून प्रत्येकी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येक घरात तिरंगा ही मोहिम राबवली जात आहे.

पण, राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार की नाही अशी शक्यता निर्माण होत आहे. पण आता येत्या दोन दिवसात पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. आज नव्या मंत्र्यांसह मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे तर आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भात चर्चा होणार आहे. नवे मंत्री आपल्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार, अशी माहिती समोर आली आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे या भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे तर आता या सर्व मंत्र्यांना कोण-कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले जाणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

संभाव्य खातेवाटप

एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)

देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ

राधाकृष्ण विखे पाटील - सहकार

सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन

चंद्रकांतदादा पाटील - महसूल, सार्वजनिक बांधकाम

विजय कुमार गावित- आदिवासी विकास

गिरीश महाजन - जलसंपदा

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा

दादा भुसे- कृषी

संजय राठोड- ग्राम विकास

सुरेश खाडे - सामाजिक न्याय

संदीपान भुंभरे- रोजगार हमी

उदय सामंत - उद्योग

तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री

रवींद्र चव्हाण- गृह निर्माण

अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास

दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण

अतुल सावे - आरोग्य

शंभूराज देसाई- उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा- विधी न्याय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com