Mumbai News: मुंबईत आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू

Mumbai latest News: मुंबईत ही जमावबंदी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत रात्रीपर्यंत लागू असणार आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceDainik Gomantak 

मुंबई पोलिसांनी आजपासून पंधरा दिवसांसांठी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. ही जमावबंदी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत लागू असणार आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार काही कारणाने कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जमावबंदी असेल मात्र संचारबंदी (No Curfew) नसेल. पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत मुंबई शहरात कलम 144 लागू केले आहे. या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या मिशन विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले, मुंबई (Mumbai) शहरात 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत लाऊडस्पीकर, मिरवणूक आणि मेळावे घेण्यास बंदी आहे.

Mumbai Police
Mumbai: तेरा वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार, आठवीतील दोन मुले पोलिसांच्या ताब्यात
  • कलम 144 अंतर्गत 'या'वर बंदी

  • 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे.

  • मिरवणुकांवर बंदी असेल.

  • फटाके फोडण्यास मनाई आहे.

  • लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी.

  • मिरवणुकीत बॅण्डला मनाई .

  • परवानगीशिवाय सामाजिक मेळावे घेण्यास मनाई .

  • आंदोलने/उपोषण करण्यास मनाई आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com