'ज्या' शाळेत पेपर फुटेल 'त्या' शाळेची मान्यताच रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

'तर' परीक्षा केंद्रच दिले जाणार नाहीत
Education Minister Varsha Gaikwad
Education Minister Varsha Gaikwaddainik gomantak
Published on
Updated on

मुंबई : दहावी, बारावी परिक्षे दरम्यान कॉपीचे प्रकार वाढले असून पेपरफुटीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागासमोर पेपरपुटी हे डोकेदुखीचे बनले असून विभागावरच प्रश्न उभे केले जात आहेत. त्यावर आता शिक्षण विभागाने जालीम उपाय करण्याच्या दृष्टीकोणाने पाऊल टाकले असून राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधान परिषदेत माहिती देताना, ज्या शाळांमध्ये कॉपी सापडेल त्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल अशी घोषणाच केली आहे. तर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बोर्डाचे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शिक्षण संस्था चालकांपुढे आता काय? असाच प्रश्न पडलेला आहे. (Schools will be de-recognized where copy is found says Varsha Gaikwad)

कॉपीला आळा घालण्यासाठी तसेच पेपर फुटी रोखण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्णय घेत परिक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी नविन नियम बनवले आहेत. तसेच काही नियम शाळांसाठीही आहेत. त्यामध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना एक तास अगोदर पोहोचावे लागेल. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जाईल, असे गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर सुरक्षित पद्धतीने परीक्षा व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परीक्षा केंद्रांवर (Examination Centers) पोलिस कर्मचारी वाढवले जातील. त्याप्रमाणे सुरू असणाऱ्या परिक्षेसाठी पोलिस महासंचालकांनी पोलीस (Police) कर्मचारी संख्या वाढवून त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी (Collector) वर्गाकडूनही या परीक्षांसाठी जातीने लक्ष देण्यात येत, असल्याचे त्या म्हणाल्या.

Education Minister Varsha Gaikwad
Phone Tapping : नाना पटोले रश्मी शुक्ला यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार

तसेच त्यांनी राज्यात दहावीची परीक्षा (SCC) सुरू आहे. पण, नगरमध्ये पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने (government) आता पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कडक पाऊल उचलल्याचे सांगितले. तसेच नगर जिल्ह्यातील त्या शाळेची मान्यता काढून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर गायकवाड यांनी, ज्या शाळेत पेपर फुटीच प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल. तर शाळेत (School) कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत, असेही गायकवाड यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com