Phone Tapping : नाना पटोले रश्मी शुक्ला यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार

Phone Tapping : रश्मी शुक्लांसह डीजी आणि नागपूर सीपी यांच्या अडचणी वाढणार
Nana Patole
Nana Patole
Published on
Updated on

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. तर याच प्रकरणी डीजी आणि नागपूर सीपी हे देखील या प्रकरणामुळे संकटात येण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रश्मी शुक्लांसह डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचे सांगितलं आहे. (Congress chief Nana Patole to file Rs 500 cr defamation suit against IPS Rashmi Shukla )

अमजद खान या नावाने नाना पटोले (Nana Patole) यांचा फोन टॅपिंग करण्यात आलं होतं. तो रश्मी शुक्ला यांनी केला होता. ते स्पष्ट झाले असून रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता याच प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत असून येत्या सोमवारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla), डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचे पटोले म्हणाले. तसेच नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात (Gujarat) पॅटर्न उघड मविआ केल्याशिवाय राहणार नाही, असं पटोले म्हणाले.

Nana Patole
पीडितेला इंजेक्शन देऊन नेलं गोव्यात; कुचिक प्रकरणाची चित्रा वाघांनी दिली माहिती

काँग्रेस विचारधारा असून कुणी संपवू शकत नाही

तसेच पाच राज्यात झालेल्या पक्षाची पिच्छेहाट वर बोलताना, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी यावर काम सुरू केले असून जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. तसेच कांग्रेस देशाची विचारधारा असून ती कधी संपू शकत नाही, कुणी संपवू शकत नाही. त्यामुळे काँग्रेस (Congress) सुधारणा करेल, असे पटोले म्हणाले.

राज्यपाल हे भाजपच्या लोकांचं ऐकतात

राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून राजकारण केले. राज्यपाल यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवड थांबली. ते फक्त भाजपच्या लोकांचं ऐकतात. अशी राज्यपालांची भूमिका नसल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. तर या सत्रात अध्यक्ष पदाची निवड होईल, असेही पटोले म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com