सरपंचीन बाई अन् उपसरपंचाचा प्रेम विवाह, अमरावतीत उपसरपंचावर जीवघेणा हल्ला

महिला सरपंच आणि उपसरपंच या दोघांचा प्रेम विवाह झाला होता. या पार्श्वभूमीवर उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Amravati
AmravatiDainik Gomantak
Published on
Updated on

उपसरपंचावरती जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वीच कांडली गावातील सरपंच (Sarpanch) महिलेसोबत उपसरपंच लग्नबंधनात अडकले होते. महिला सरपंच आणि उपसरपंच या दोघांचा प्रेम विवाह (Love Marriage) झाला होता. या पार्श्वभूमीवर उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Sarpanch woman and sub sarpanchs love marriage fatal attack on sub sarpanch in Amravati)

Amravati
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'देव' असल्याचं भाजपचं वर्तन: नाना पटोलेंची टिका

अमरावतीच्या कांडली (Amravati Crime) गावात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप आहे तर या हल्ल्यात उपसरपंच धंडारे यांच्या पाठीवर आणि गळ्यावरती गंभीर जखमा झाल्या आहेत. रोहित मरसकोल्हे या आरोपीने धंडारेवरती प्राणघातक हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. सध्या उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावरती अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र अमरावतीच्या कांडली गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रकरण काय आहे?

19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गावातील महिला सरपंचाशी विवाह केल्याने संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडलीचे उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावरती काल रात्री 11 वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Amravati
फ्लॅटमधून कोटींची रोकड जप्त, नोटांचे ढिगारे पाहून पोलीस चक्रावले

उपसरपंच गंभीर जखमी,

आरोपी रोहित मरसकोल्हे याने हा प्राणघातक हल्ला केला असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्राणघातक हल्ल्यात उपसरपंच गंगा धंडारे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावरती सध्या अमरावती मधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आरोपीने हल्ला का केला याचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.

शिवजयंती दिवशी थाटामाटात लग्न

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतचे उपसरपंच गंगा धंडारे यांनी 19 फेब्रुवारीला गावातील सरपंच सविता आहाके यांच्या सोबत थाटामाटात लग्न गाठ बांधली. गावांतील सरपंच व उपसरपंच यांनी एकत्र येऊन लग्न केल्याने आणि सरपंच-उपसरपंच एकाच कुटुंबात झाल्याने या विवाहाची चर्चा राज्यभर झाली. या विवाहाचे अनेकांनी कौतुक केले होते मात्र अशातच आता लग्नाला केवळ दोन आठवडे उलटले असताना उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावरती काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास कांडली जुनी वस्ती येथे प्राणघातक हल्ला झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com