पंतप्रधान नरेंद्र मोदी 'देव' असल्याचं भाजपचं वर्तन: नाना पटोलेंची टिका

भाजपसाठी तर नरेंद्र मोदींच देव आहेत असं वर्तन भाजपचं आहे, असा हल्लाबोलही पटोलेंनी भाजपला लगावला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावरती आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं (Chhatrapati Shivaji Maharaj) अनावरणही केलं. यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पंतप्रधानांनी अपमान केला. त्यांच्या मनातील छत्रपतींच्या विरोधातली मानसिकता स्पष्ट दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी (Nana Patole) दिली आहे. (BJPs behavior that Prime Minister Narendra Modi is God Criticism of Nana Patole)

PM Narendra Modi
फ्लॅटमधून कोटींची रोकड जप्त, नोटांचे ढिगारे पाहून पोलीस चक्रावले

त्यासोबतचं राज्यपाल देखील छत्रपतींचा अपमान करतात. भाजपसाठी (BJP) तर नरेंद्र मोदींच देव आहेत असं वर्तन भाजपचं आहे, असा हल्लाबोलही पटोलेंनी भाजपला लगावला आहे. राजमुद्रा अन् छत्रपतींचा अपमान करण्याचा कॉन्ट्रॅक्ट भाजपनं घेतलाय का? असाही सवाल नाना पटोलेंनी भाजपला विचारला आहे.

नरेंद्र मोदी 'गो बॅक'चे नारे पुण्यातही बघायला मिळत आहेत, संपुर्ण देशभरात मोदींचा विरोध होतोय. पुण्याच्या जनतेची मोदी गैरसोय करत आहेत. पुणेकर देखील भाजपवर नाराज दिसत असल्याचं नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं आहे.

PM Narendra Modi
पुणेकरांच्या सहनशीलतेच अजित दादांकडून कौतुक

नाना पटोलेंनी नुकतंच एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये मोदींचा फोटो आहे. या फोटोत मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करताना दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करत नाना यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रा समोर शेवटी तुम्ही छोटे. #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा, असंही कॅप्शन दिलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com